मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा – आमदार अतुल भातखळकर

मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा – आमदार अतुल भातखळकर

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याला अटक झाल्यानंतर या विषायत पहिल्यापासूनच आक्रमक असलेले विरोधक अजूनच आक्रमक झालेले दिसत आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर हे सचिन वाझे प्रकरणावरून सरकारवर तुटून पडले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करावी अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.

शनिवारी रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी सचिन वाझे याला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी ११ वाजता वाझे हे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या पेडर रोड येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. ही चौकशी तब्बल तेरा तास चालली. तेरा तासांच्या चौकशी नंतर वाझे याला एनआयए कडून अटक करण्यात आली. वाझे याच्या अटकेनंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला.

हे ही वाचा:

सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?

सचिन वाझेला अटक

मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे सोबतच एका विधान परिषदेच्या आमदाराचेही नाव?

काय म्हणाले भातखळकर?
अतुल भातखळकर यांनी लागोपाठ चार ट्विट्स करत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. संपूर्ण करियर वादग्रस्त असलेले अधिकारी वाझे यांना पोलीस सेवेत बहाल केल्यावर इतकी महत्वाची पोस्टिंग कोणाच्या आशीर्वादाने मिळाली याचा खुलासा मुख्यमंत्र्यानी करावा अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

फक्त वाझे याच्या अटकेने विषय संपत नाही. तर त्याच्या पाठीशी कोण होते आणि कोणाच्या आदेशाने तो काम करत होता याचा तपास व्हावा असे भातखळकरांनी म्हटले आहे. सोबतच मुंबई पोलिसांच्या हकालपट्टीची मागणीही भातखळकरांनी केली आहे.

वाझे सतत कोणत्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते आणि त्याला कोणाचा राजकीय आशीर्वाद होता जनतेसमोर हे आलेच पाहिजे असे भातखळकरांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे. या सोबतच पत्रकार अर्णब गोस्वामी याच्या अटकेसाठी जाताना वाझे मनसुखची गाडी घेऊन गेले होते ही माहिती धक्कादायक आहे. परमबीर सिंग यांच्या काळात मुंबई पोलिसांची किती वाताहात झाली हे यातून स्पष्ट होते असा घणाघात भातखळकरांनी केला आहे.

Exit mobile version