आदित्य ठाकरेंची रामराज्याची प्रार्थना फळली!

आदित्य ठाकरेंची रामराज्याची प्रार्थना फळली!

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही वेगाने घडामोडी घडत आहेत. त्यावरून अनेक निष्कर्ष आणि शिवसेनेवर टीका केली जात आहे. यामध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका होत आहे.

काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात रामराज्य यावे, अशी प्रार्थना केली होती. त्यांनी केलेल्या या प्रार्थनेवरून भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी अयोध्येत महाराष्ट्रात रामराज्य यावं म्हणून प्रार्थना केली होती म्हणे, अशी टीका भातखळकर यांनी ट्विटरवरून टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी केलेली रामराज्याची प्रार्थना पूर्ण झाली, अशी आदित्य ठाकरेंवर टीका होत आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांनी सांगितले, सरकारचा कारभार आटोपला

‘जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल’

राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण

ठाकरे सरकार अडचणीत; ४० पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा शिंदेंचा दावा

आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून मंत्रिपद हटवले आहे. त्यामुळे ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार का? अशाही चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे अनेक आमदारांसोबत सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. यामुळे महाराष्ट्राचे राजकरण चांगलेच तापले आहे. आतापर्यंत ४६ आमदार सोबत असून, या संख्येत आणखी वाढ होईल, असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितले आहे. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष ६ आमदार असल्याची माहिती समोर येत आहे.

Exit mobile version