संजय राऊत यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय?

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला सवाल

संजय राऊत यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय?

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले होते असा सवाल भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. त्यांनी असली वायफळ आणि फालतू बडबड करणे सोडावे नाहीतर पुन्हा जुने दिवस येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

संजय राऊत यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात रोखठोकमधून भारतीय जनता पक्षाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय, असा सवाल उपस्थित केला, त्यावर अतुल भातखळकर यांना सवाल केल्यावर त्यांनी उपरोक्त जळजळीत प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा:

सावरकरांच्या सुरक्षाविषयक दृष्टिकोनाची अंमलबजावणी केली असती तर…

कर्नाटकातील कला संस्कृतीच्या जपणुकीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक

तुम्ही आधारकार्ड पॅनशी लिंक केले आहे का ?

अफगाणी महिलांना एनजीओमध्ये काम करण्यास मनाई; तालिबानी आदेश

वरून हा सवाल उपस्थित केला. मल्लिकार्जुन खरगे यांनी हेटाळणीच्या स्वरात भाजपाचे स्वातंत्र्यलढ्यात कुत्रेही मेले नसेल असे म्हटले होते. त्याचाच आधार घेत संजय राऊत यांनीही आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न सामना या दैनिकाच्या रोखठोकमधून केला आहे. त्यात त्यांनीही भाजपाला तुमचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान काय असा प्रश्न विचारला आहे. त्याशिवाय, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल या नेत्यांची प्रतिके भाजपाने चोरली आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version