सध्या देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्याला आळा घालण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील आपल्या मतदार संघात काही ठिकाणी कोविड लसीकरण केंद्रे चालू करण्याची विनंती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना केली आहे.
कोविडला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम असल्याचे समोर येत आहे. अशावेळेस जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावे यासाठी विविध संस्था देखील जनजागृती करत आहेत. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहून १० जागा सुचवल्या आहेत आणि त्या ठिकाणी लसीकरण केंद्रे चालू करण्याची विनंती केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
हे ही वाचा:
परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल
लसीकरणासाठी दोन किलोमीटरपर्यंत रांगा
कर्नाटक राज्यसरकार खरेदी करणार कोविड लसीचे १ कोटी डोस
त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे की,
माझ्या कांदिवली पूर्व मतदार संघात १८-४५ वयोगटातील नागरिकांसाठी १० नवी लसीकरणकेंद्रे तातडीने सुरू करावीत,आर्थिक अडचण असेल तर लोकप्रतिनिधी या नात्याने आर्थिक भार उचलण्याची माझी तयारी आहे असे पत्र महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना मी पाठवले.सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.
माझ्या कांदिवली पूर्व मतदार संघात १८-४५ वयोगटातील नागरिकांसाठी १० नवी लसीकरणकेंद्रे तातडीने सुरू करावीत,आर्थिक अडचण असेल तर लोकप्रतिनिधी या नात्याने आर्थिक भार उचलण्याची माझी तयारी आहे असे पत्र महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना मी पाठवले.सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. pic.twitter.com/tGfwkZSSfL
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 29, 2021
या पत्रात त्यांनी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल इक्बाल सिंह चहल यांचे अभिनंदन देखील केले आहे.