कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शाई ओतून विटंबना करण्याच्या प्रकारावरून सध्या चांगलेच राजकारण तापताना दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लक्ष घालावे असे म्हटले आहे. पण महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता निघाल्यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट करत भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. छत्रपतींच्या पुतळ्याच्या विटंबनेचा राजकारण करणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझे खडे सवाल आहेत असे म्हणत भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारा काँग्रेस कार्यकर्ता?
‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’
अनिल परब, हा तुझ्या बापाचा पैसा आहे का?
विश्व हिंदू परिषद अमेरिकेचे संस्थापक डॉ.महेश मेहता यांचे निधन
हे आहेत भातखळकरांचे तीन सवाल!
अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना तीन सवाल उपस्थित केले आहेत
१) ज्या नावाब मलिक यांना आपण ‘गुड गोईंग’ म्हणाला होतात, तेव्हा आपल्याला हे आठवले नाही का
२) आपण ज्यांच्या सोबत सत्तेत बसला आहात त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराने (राजू नवघरे) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बूट घालून विटंबना केली होती. तेव्हा तुम्ही मूग गिळून गप्प का बसला होतात?
३) कर्नाटकच्या घटनेत काँग्रेस पक्षाच्या आमदाराच्या खास कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. तेव्हा आपण या संदर्भात सोनिया गांधींना पत्र लिहिणार का?
छत्रपतींच्या पुतळ्यावर शाई फेकणारा काँग्रेस आमदार बी. जमिरचा कार्यकर्ता. कर्नाटक सरकारने त्याला अटक केली आहे. टिपुसेना काँग्रेसला जाब विचारायचा सोडून भाजपा कार्यालयावर मोर्चा काढतेय. छत्रपतींसमोर नतमस्तक न होण्याची मुजोरी करणाऱ्या नवाब मलीकला कडेवर घेणारे आम्हाला शहाणपण शिकवतायत. pic.twitter.com/ngWbpZJKpN
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 18, 2021
दरम्यान आमदार अतुल भातखळकर यांच्या या सवालांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेकडून काही उत्तर मिळते का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. पण या प्रकरणात काँग्रेस कार्यकर्ता अडकल्यामुळे शिवसेनेची चांगलीच गोची झाली आहे असे म्हणावे लागेल.