झोपडपट्ट्या किंवा रेल्वे ट्रॅकवर छोट्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यापार चालतो. त्यांच्यावर पोलिस कारवाई करतात पण ती कारवाई कायमस्वरूपी होत नाही. असे अमली पदार्थ विकणारे लोक हे बदलत असतात, ते त्याच व्यवसायात असतील असे अजिबात नाही. मग अशा लोकांवर तडाखेबंद अशी कारवाई केली जाणार आहे का सरकारच्या वतीने असा प्रश्न भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी लक्ष्यवेधीच्या माध्यमातून नागपूर अधिवेशनात उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरही दिले.
आमदार भातखळकर यांनी म्हटले की, स्थानिक स्तरावर फुटकळ प्रमाणावर ड्रग्सचे वितरण केले जाते, त्यातल्या अनेक गोष्टी या जसे आयोडेक्सचा वापर किंवा अतिवापर असेल. काही प्रमाणांत गांजा, चरस ,एम डी वाटपाचे काम चालते. आणि हे काम करणारी लोकं सातत्याने बदलत असतात. पोलिसांकडे गेलो तक्रार केली तर एकाच प्रकारची उत्तरे मिळतात आम्ही त्यांना पकडले, काही दिवसांनी ते सुटले आता दुसरा मनुष्य आहे,आणि अशी एक गॅंग असते.
आमदार भातखळकर पुढे म्हणाले की, माझे दोन्ही प्रश्न हे स्थानिक स्तरांवर आहे,माझा थेट प्रश्न या निमित्ताने असा आहे, झोपडपट्टीमध्ये रेल्वेट्रॅकवर अशापद्धतीने उद्योग करणारे काही विशिष्ठ लोक आहेत ती प्रत्येक वेळेस त्याच गुन्ह्यात सापडतील याची आवश्यकता नसते अशी लोकं पोलिसांना माहिती असतात. लोकल पोलीस स्टेशनला त्यामुळे अशा लोकांची नावे काढून या ड्रुग्स च्या विरोधात येणाऱ्या काळांत काही एक तालबद्ध तडाखेबंदच्या स्वरूपाची कारवाई करण्याचे सरकार विचार करत आहे का ? हा माझा पहिला प्रश्न आहे.
भातखळकर यांनी दुसरा प्रश्न विचारला की, जनजागृती करण्याकरता दिंडोशी आणि कुरार पोलीस स्टेशन मध्ये काही शिबिरं त्याठिकाणी आयोजित केली, दिंडोशी पोलीस स्टेशन माझ्या हद्दीमध्ये येते पण मला कधी कोणी कळवले नाही की,अशा पद्धतीचे जनजागृती शिबीर पोलीस करतायत , तर यापुढे पोलीस किंवा अन्य यंत्रणा असे काही जनजागृती शिबीर करत असतील, तर त्यावेळच्या लोकल प्रतिनिधींना या संदर्भात माहिती देणार का? असे माझे स्पेसिफिक दोन प्रश्न आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही
तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार
खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक
यावर उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की , भातखळकर यांनी पहिला प्रश्न उपस्थित केलाय ती वस्तुस्थिती आहे. ड्रग्स च्या संदर्भातल मेजर चॅलेंज असे आहे क्वांटिटी कमी असते आणि त्याची किंमत जास्त असते. त्यामुळे अगदी छोट्याशा कंटेनर मध्ये, छोट्या बॉक्स मध्ये,एखाद्या मोटर सायकल मध्ये अमली पदार्थांची वाहतूक करतात. आणि त्यासोबत हे जे अमली पदार्थ वाहून नेणारे पेडलर्स असतात किंवा अशा प्रकारचे काम करणारे असतात त्यांच्यावर कारवाई कशी होईल एक तोही विषय मध्यंतरीच्या काळामध्ये एका इंटेलिजन्सच्या आधारावर आपण धारावीमध्ये कारवाई केली आणि त्या कारवाईमध्ये केवळ पेडलऱ नाही तर त्यांची संपूर्ण साखळी आपण शोधून काढली. त्यामुळे पेडलऱ सापडून फायदा होत नाही. जोपर्यंत त्याची संपूर्ण साखळी आपल्याला सापडत नाही आणि माल येतो कुठून आहे हे माहीत पडत नाही, तो पर्यंत त्याचा फायदा होत नाही.
पोलिसांची पद्धत काय असते पेडलऱ सापडला कि त्याच्यावर गुन्हा दाखल करून चार्जशीट दाखल केली की काम संपते. पण आता पोलिसांना सूचना दिल्यात कि नुसते पेडलऱला पकडून चालणार नाही त्याची पूर्ण साखळी शोधून काढा, जोपर्यंत शेवटच्या सोर्सपर्यंत पोचत नाही तोपर्यंत शांत बसू नका, अशा सूचना दिल्या आहेत शिवाय, यापुढे जे काही जागृतीचे कार्यक्रम पोलीस स्टेशनला होतील त्यांना सूचना देण्यात येतील. स्थानिक लोकप्रतिनिधींना आपण त्यात सहभागी करून घ्या कारण लोकप्रतिनिधी सहभागी झाले तर त्या कार्यक्रमांची व्यापकता वाढवता येईल, असेही फडणवीस म्हणाले.