धमकावून दुकाने बंद करणाऱ्या शिवसैनिकांना रोखण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते सोमवारी कांदिवलीत रस्त्यावर उतरले. झटापट झाल्यामुळे पोलिसांनी सुधीर शिंदे आणि नितीन चौहान या आमच्या पदाधिकाऱ्यांसह काही शिवसैनिकांना अटक केली.
भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी पोलिसांशी संवाद साधून दुकानदारांवर दुकाने बंद करण्यासाठी कोणताही दबाव आणू देऊ नये, असे आवाहन केले. दुकाने सुरू आहेत का, हे पाहण्यासाठी आणि ती बंद करावीत असा दबाव आणण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर आल्यानंतर दुकानदारांना दुकाने उघडी ठेवण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून भाजपाने रस्त्यावर उतरत चोख प्रत्युत्तर दिले. हर जोर जुल्म के टक्कर में, संघर्ष हमारा नारा है… अशा शब्दांत आमदार भातखळकर यांनी ट्विट करत महाविकास आघाडीच्या या ‘महाराष्ट्र बंद’वर टीका केली.
हर जोर जुल्म के टक्कर में
संघर्ष हमारा नारा है…धमकावून दुकाने बंद करणाऱ्या शिवसैनिकांना रोखण्यासाठी भाजपा कार्यकर्ते आज कांदिवलीत रस्त्यावर उतरले. झटापट झाल्यामुळे पोलिसांनी सुधीर शिंदे आणि नितीन चौहान या आमच्या पदाधिकाऱ्यांसह काही शिवसैनिकांना अटक केली.#NoMaharashtraBandh pic.twitter.com/FBbUuPlrJZ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 11, 2021
यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी पोलिसांना सांगितले की, दुकाने उघडी आहेत की बंद आहेत हे पाहण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आले होते. पण ज्यांना दुकाने उघडायची आहेत, त्यांना उघडू द्या इतकी आमची मागणी आहे.
हे ही वाचा:
‘जरा दोन पेंग्विनचे लाड कमी करा आणि मुंबईचे रस्ते तरी दुरुस्त करा’
रेल्वेची ‘पिकदानी पाकिटे’ संकल्पना काय आहे? वाचा सविस्तर
अनिल देशमुखांच्या मुलाला होणार अटक?
पुष्पक एक्स्प्रेस बलात्कार प्रकरणातील आठही आरोपींच्या गठड्या वळल्या!
पोलिसांनी यावेळी आमदार भातखळकर यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शाब्दिक चकमक उडाली. आमदार भातखळकर यांनी जाब विचारला की, महाराष्ट्रात मोगलाई सुरू झाली आहे की काय? तुम्ही पोलिस आहात की शिवसेनेचे कार्यकर्ते आहात? पोलिसांनी त्यांना आम्ही तुम्हाला कार्यालयात सोडतो असे म्हटल्यावर मी माझ्या गाडीने जाईन, असे उत्तर आमदार भातखळकर यांनी दिले.