29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरराजकारणनितीन देसाई आत्महत्येप्रकरणी रशेष शाह, एडेलवेस कंपनीची चौकशी होणार

नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी रशेष शाह, एडेलवेस कंपनीची चौकशी होणार

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Google News Follow

Related

कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्येप्रकरणी रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपन्यांची सुध्दा चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. आमदार ऍड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून नितीन देसाई यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू एवढीच चौकशी न करता ही चौकशी अधिक व्यापक करण्याची मागणी त्यांनी केली.

 

हे ही वाचा:

चेंबूरच्या आचार्य कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून विधानसभेत नितेश राणे विरुद्ध अबू आझमी

गुरूजी भिडे आणि जातवादी किडे

भिडेंना गुरुजी म्हटल्याने कुणाला काय अडचण?

याबाबत आमदार ऍड. आशिष शेलार म्हणाले की, आपल्या कर्तृत्त्वाने, प्रतिभेने कलादिग्दर्शन क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे, चार राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे नितिन देसाई यांनी दुर्दैवीरीत्या आपले जीवन संपवले. त्यांनी एनडी स्टुडिओवर १८० कोटींचे कर्ज काढले होते. या १८० कोटींचे २५२ कोटी झाले. या प्रकरणातून रशेष शाह नामक व्यक्ती आणि ‘एआरसी एडेलव्हाईस’ कंपनीच्या सावकारी पद्धतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

 

त्यामुळे केवळ अपघाती मृत्यू म्हणून या प्रकरणाची चौकशी न करता या कंपनीच्या व्याजाचा दर, व्याज वृद्धीचा दर, वसूलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष टीम नेमून चौकशी करावी आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा, अशी मागणी सभागृहात केली. या कंपन्या आधुनिक सावकार असून त्यांची अन्य दोन प्रकरणाची माहिती आपल्याकडे असून तीही गृहमंत्र्यांकडे देणार असल्याचे सांगितले. दरम्यान, त्यावर उत्तर देताना गृहमंत्र्यांनी अशी चौकशी करण्याचे मान्य केले.

 

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्टला आपल्या एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण चित्रसृष्टीवर अवकळा पसरली. कलेच्या क्षेत्रातील नितीन देसाई यांच्यासारख्या गुणवत्तावान व्यक्तीने अशी आत्महत्या का केली असेल असा विचार करत अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा