राजस्थानमधील काँग्रेसचे मंत्री म्हणाले, महिला कर्मचारी म्हणजे डोकेदुखी!

राजस्थानमधील काँग्रेसचे मंत्री म्हणाले, महिला कर्मचारी म्हणजे डोकेदुखी!

राजस्थान सरकारमधील काँग्रेसचे शिक्षण मंत्री गोविंदसिंग डोटासरा यांनी अलीकडेच एक वक्तव्य केले आहे. त्याचे ‘ते’ वक्तव्य महिलांविषयी अपमानास्पद असल्याची टीका केली जात आहे.

सोमवारी जयपूरमध्ये आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त एका मेळाव्याला संबोधित करताना मंत्री गोविंदसिंग डोटासरा म्हणाले की, “ज्या शाळांमध्ये महिला कर्मचारी जास्त आहेत, तिथे अधिक भांडणे होतील. परिणामी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना सॅरीडॉन (डोकेदुखीसाठीचे एक औषध) औषधांचा भडिमार करावा लागेल.

“माझ्या विभागाचा प्रमुख म्हणून, मला हे सांगायचे आहे की ज्या शाळांमध्ये जास्त महिला कर्मचारी आहेत त्या सर्व ‘विशेष’ आहेत. तिथे जास्त मारामारी होते. कधीकधी रजेसाठी मारामारी होते, इतर दिवस ते काहीतरी वेगळ्यासाठी असतात. त्यामुळे प्राचार्य किंवा इतर शिक्षकांना सॅरिडॉनचा सहारा घ्यावा लागतो.” मंत्री गोविंदसिंग डोटासरा म्हणाले.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या योजना मानवाधिकारांचं जतन करणाऱ्या

काय आहे १०० लाख कोटींची गती शक्ती योजना?

महिन्याचा पास सक्तीचा असल्यामुळे विनातिकीट प्रवाशांची गर्दी

शरद पवार आयकर छाप्यांबाबत बोलणार?

गोविंदसिंग डोटासरा यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर महिलांविषयी अपमानास्पद टिप्पणी केल्याची टीका सर्व स्तरातून केली जात आहे. राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असलेले गोविंदसिंग डोटासरा म्हणाले की, “राजस्थान सरकारने नेहमीच महिलांची सुरक्षा आणि आराम याची चिंता केली आहे. त्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये त्यांच्या पसंतीचे पद दिले आहे.

Exit mobile version