शिंजो आबे यांच्या मृत्यूचा अग्निपथशी काय संबंध?

शिंजो आबे यांच्या मृत्यूचा अग्निपथशी काय संबंध?

abe-killed

जपानचे माजी राष्ट्राध्यक्ष शिंजो आबे यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर त्यांचे त्यात निधन झाले मात्र त्यांची हत्या करणाऱ्या इसमाच्या पार्श्वभूमीवरून त्याचा संबंध केंद्र सरकारने सुरू केलेल्या अग्निपथ या योजनेशी लावण्याचा प्रकार समोर आला आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी ट्विट करत जपानच्या स्वसंरक्षण दलाचा माजी सैनिक असलेल्या एकाने शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडल्या, असे म्हटले. त्याचा संबंध राजपूत यांनी अग्निपथशी जोडला. त्यांनी म्हटले की, जपानच्या स्वसंरक्षण दलातील सैनिकांना निवृत्तीवेतन नाही. त्यामुळे हे अगदी अग्निपथ योजनेसाठी निवडण्यात आलेल्या अग्निवीरांसारखेच आहे.

तृणमूल काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या जागो बांगला यामधून अशीच थिअरी मांडण्यात आली आहे. त्यात एक लेख लिहिण्यात आला असून त्याचा मथळा असा आहे की, शिंजो आबे यांच्या खुनावर अग्निपथची छाया.

शिंजो आबे यांचा मृत्यू ४१ वर्षीय तेत्सुया यामागामी याने केलेल्या गोळीबारात झाला होता. आबे हे एका ठिकाणी रस्त्यावर भाषण करत असताना या व्यक्तीने मागून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्यांना लागली. तेत्सुया हा मेरिटाइम स्वसंरक्षण दलात सेवेत होता. २ वर्षे आणि ९ महिने त्याने काम केले होते. मात्र हे काम करून त्याला तब्बल १५ वर्षे लोटली होती. पण त्याची ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन वडाची साल पिंपळाला कशी लावता येईल, याचा विचार भाजप विरोधी पक्षांनी सुरू केला.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्री असलो तरी, जनतेचा सेवक’

जोहान्सबर्गमध्ये झालेल्या गोळीबारात १४ जणांचा मृत्यू

गौतम अदानींची होणार टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री?

एलन मस्क म्हणजे तिकीट नसलेले प्रवासी; ट्विटर करार रद्द केल्यानंतर महिद्रांनी लगावला टोला  

 

यामागामी याला कोणतेही निवृत्ती वेतन मिळाले नव्हते किंवा तो बेरोजगार असल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले असा प्रचार विरोधकांनी सुरू केला. याआधीही काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी अग्निवीर हे दहशतवादी बनतील अशी थिअरी मांडण्यास सुरुवात केली होती.

यामागामीच्या आईला कुठल्या तरी धार्मिक गटाने लुटल्याच्या रागातून त्याने ही हत्या केल्याचेही समोर येत होते. त्यामुळे याचा अग्निपथशी काहीही संबंध नाही, हेदेखील स्पष्ट झाले.

Exit mobile version