मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत २०१९ मध्ये काश्मीर मधील ३७० आणि ३५ अ हटवले. त्यानंतर राज्यात कोणत्या सुधारणा झाल्या, काय बदल झाले यावर केंद्र सरकारकडून राज्यसभेत स्पष्टीकरण दिले गेले. काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांनी यासंबंधी काही प्रश्न विचारले होते. त्यावर उत्तर देताना बदलणाऱ्या परिस्थितीत ३६६ दहशतवादी मारले गेल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.
राज्यसभेत काँग्रेसच्या एका खासदाराने केंद्रीय गृहमंत्रालयाला विचारले होते की, कलम ३७० रद्द केल्यानंतर किती काश्मिरी पंडित आणि हिंदूंचे पलायन झाले, किती दहशतवादी मारले गेले, किती सामान्य नागरिक मारले गेले आणि सुरक्षा दलाचे किती जवान शहीद झाले असे प्रश्न दिग्विजय सिंह यांनी विचारले होते.
हे ही वाचा:
भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली बिपीन रावत यांना श्रद्धांजली
पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार
सीडीएस बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन
यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. काश्मिरी पंडित आणि हिंदू यांचे पलायन झाले का या प्रश्नावर एकाही काश्मिरी पंडित किंवा हिंदूचे पलायन झालेले नाही, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. राज्यातून ३७० कलम हटवल्यानंतर ३६६ दहशतवादी तर ९६ सामान्य नागरिक मारले गेल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले. ८१ सुरक्षा दलाच्या जवानांना वीरमरण आल्याचेही केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले. नुकतेच काही कुटुंबे पहाडी भागातून जम्मूमध्ये वास्तव्याला गेल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले.