‘आत्मनिर्भर डिफेन्स’ च्या दिशेने महत्वाचे पाऊल खरेदी करणार २७००० कोटींची भारतीय बनावटीची शस्त्रसामग्री!!!!
भारतीय सरंक्षण मंत्रालयाने ₹२८,००० कोटींची नवी शस्त्रास्त्रे घेण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे, ज्यापैकी ₹२७,००० कोटींची खरेदी भारतीय उत्पादकांकडून केली जाणार आहे. भारतीय बनावटीचे हवाई देखरेखीची यंत्रणा, नौदलासाठी जहाजे आणि सैन्यासाठी ‘मॉड्युलर ब्रिज’ अशा महत्वाच्या घटकांचा यात समावेश आहे. गुरुवारी सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ‘डिफेन्स एक्विझिशन कौंसिल’ ची महत्वाची बैठक पार पडली ज्यात हा निर्णय घेण्यात आला. भारत सरकारच्या महत्वाकांक्षी ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेच्या दृष्टीने हे एक दमदार पाऊल आहे असे मानले जात आहे. काँग्रेस सरकारच्या काळात शस्त्रास्त्र खरेदी ही घोटाळ्यांच्या दलदलीत अडकलेली होती. ज्याचे गंभीर परिणाम भारतीय संरक्षण यंत्रणेला भोगावे लागले. २०१४ पासुन मोदी सरकारने या विषयावर विशेष लक्ष केंद्रीत केले. त्याचीच मधुर फळे आता दिसत आहे.
हे ही वाचा: क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि संरक्षण कवच- भारताची संरक्षणसिद्धतेसाठी जोरदार तयारी