लसीकरण देशभरात सुरू होऊन दोन महिने लोटले आहेत. तरीही महाविकास आघाडीच्या सरकारचा लसीकरणाबाबत गोंधळ सुरूच आहे. विविध विषयांत सातत्याने महाविकासआघाडी मधील आपापसांतील गोंधळ समोर आला आहे. आत्ता देखील लसींच्या खरेदी प्रक्रियेवरून महाविकासआघाडी मधील दोन मंत्री दोन वेगवेगळी विधाने करताना समोर आले आहेत.
मुंबई महानगर पालिकेने लसींच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढले होते. त्याबाबत बोलताना महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी लसींच्या खरेदीसाठी केंद्राने एकच ग्लोबल टेंडर काढावे असे विधान केले होते. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राने काढलेल्या ग्लोबल टेंडरला केंद्राची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा असल्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा:
मुंबईत आज-उद्या लसीकरण बंद ठेवून काय वीकेंड साजरा करायचा आहे का?
मोदी सरकारच्या बदनामीचा कट धुळीला
शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने चिंता वाहणाऱ्या मोदी सरकारचे अभिनंदन
ठाकरे सरकार खोटं बोलत होतं- विनायक मेटे
महाविकास आघाडी मधील या कमालीच्या गोंधळावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीकेची झोड उठवताना भातखळकर म्हणतात ठाकरे सरकारचे मंत्री तोंडाला येईल ते बोलतात आणि फक्त बोलत आहेत. यामध्ये भरडली जाते जनता. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,
आरोग्यमंत्री टोपे काल म्हणाले होते की लसींसाठी केंद्राने एकच ग्लोबल टेंडर काढावा. आज अजित पवार म्हणतायत टेंडरसाठी केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा. अनेक राज्य लस खरेदी करून मोकळी झाली, परंतु ठाकरे सरकारचे मंत्री मात्र तोंडाला येईल ते बोलतायत आणि फक्त बोलतायत. भरडली जातेय जनता.
आरोग्यमंत्री टोपे काल म्हणाले होते की लसींसाठी केंद्राने एकच ग्लोबल टेंडर काढावा. आज अजित पवार म्हणतायत टेंडरसाठी केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा. अनेक राज्य लस खरेदी करून मोकळी झाली, परंतु ठाकरे सरकारचे मंत्री मात्र तोंडाला येईल ते बोलतायत आणि फक्त बोलतायत. भरडली जातेय जनता. pic.twitter.com/9mdZ70GdDg
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 15, 2021
आरोग्यमंत्री टोपे काल म्हणाले होते की लसींसाठी केंद्राने एकच ग्लोबल टेंडर काढावा. आज अजित पवार म्हणतायत टेंडरसाठी केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा. अनेक राज्य लस खरेदी करून मोकळी झाली, परंतु ठाकरे सरकारचे मंत्री मात्र तोंडाला येईल ते बोलतायत आणि फक्त बोलतायत. भरडली जातेय जनता.
देशात लसीकरण मोहीम जोमाने सुरू असताना महाराष्ट्रात मात्र सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद राहिलेली पाहायला मिळत आहेत. यावरून भाजपाने सातत्याने सरकारला धारेवर धरले आहे. लसीकरणाच्या नियोजनातील महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांमध्ये असलेला गोंधळ या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.