या दोन केंद्रीय मंत्र्यांनी घेतला माटुंग्यात डोशाचा आस्वाद

या दोन केंद्रीय मंत्र्यांनी घेतला माटुंग्यात डोशाचा आस्वाद

गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्री सामान्य नागरिकांप्रमाणे वावरताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी जनतेत मिसळण्याचा सल्ला मंत्र्यांना दिला आहे.

पंतप्रधान मोदींच्या सल्ल्यानुसार मंत्री जनभावना समजून घेण्यासाठी त्यांच्यात थेट सहभागी होत आहेत. याची सुरुवात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि मुख्तार अब्बास नकवी हे मुंबईतील माटुंगा येथील कॅफे म्हैसूर येथे दिसले.

महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नकवी हे आपापल्या मंत्रालयाच्या कार्यक्रमानिमित्त मुंबईत होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि मुख्तार अब्बास नकवी हे सामान्य व्यक्तीसारखे मुंबईतील माटुंगा येथील कॅफे म्हैसूर येथे डोसा खाण्याचा आनंद घेताना दिसले.

हे ही वाचा:

बांधवगडमधील हत्तींना १० सप्टेंबरपर्यंत सुट्टी! काय आहे बातमी वाचा…

‘चितळे एक्स्प्रेस’ची आता इथेही शाखा!

बंदीचा उत्सव; दर्शनाला बंदी, जमावबंदी, संचारबंदी

असे आहे ‘मुळशी पॅटर्न’ चे ‘अंतिम’ हिंदी रुप! पोस्टर प्रदर्शित

यापूर्वी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे सामान्य व्यक्तीप्रामाणे केंद्र सरकारच्या आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीतील सीजीएचएस डिस्पेंसरीत गेले होते. तेथे त्यांनी आपली बनावट ओळख सांगून आरोग्याच्या अडचणी सांगून उपचार करून घेतले. त्यानंतर त्यांनी डॉक्टरला मंत्रालयात बोलावून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल प्रशंसा केली. स्मृती इराणी याआधीही त्यांचा मतदार संघ असलेल्या अमेठीत लस्सी पिताना दिसल्या होत्या.

नुकत्याच मोदी सरकारमधील मंत्र्यांनी देशभर लोकांमध्ये जाऊन जनआशीर्वाद यात्रा काढली होती. देशभरात २४ किलोमीटरचे अंतर कापून पक्षाने १४ दिवसांमध्ये पाच हजारपेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित केले, असा दावा भाजपने केले आहे.

 

Exit mobile version