केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या शैलीत राजकीय नेत्यांची फटक्यात तुलना केली आहे. कोणता फटका कोणाप्रमाणे बाजू शकतो असे विचारले असता दानवे म्हणाले, मोदी म्हणजे रॉकेट, शरद पवार डबल आवाज अन् उद्धव ठाकरे फुसकाबार असे दानवे म्हणाले.जालन्यातील भोकरदन येथे मंत्री रावसाहेब दानवे फटाके खरेदीकरण्यासाठी गेले असता त्यांनी अनेक राजकीय नेत्यांची तुलना वेगवेगळ्या फटक्यात केली.
कोणता फटका कोणाला देणार असे रावसाहेब दानवेंना विचारले असता ते म्हणाले, नरेंद्र मोदी (रॉकेट) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रावर रॉकेट पाठवलं आहे. जगातून आतापर्यंत कोणीच जिथे गेलं नाही तिथे मोदींनी रॉकेट पाठवले. त्यामुळे सध्या राजकारणातील रॉकेट मोदी हे आहेत, असं दानवे म्हणाले. देवेंद्र फडणवीस (सुतळी बॉम्ब) : देवेंद्र फडणवीस म्हणजे सुतळी बॉम्ब आहे. कधी कोणावर जाऊन पडेल आणि कोणाचे काय नुकसान करतील सांगताचं येणार नाही. त्यामुळे आमच्याजवळ तो सुतळी बॉम्ब आहे असं दानवे म्हणाले.उद्धव ठाकरे (फुसका फटाका) : उद्धव ठाकरे म्हणजेच फुसका फटाका आहे. त्यामुळे फुसका फटाका उद्धव ठाकरे यांच्यासाठी घेणार असल्याचे दानवे म्हणाले.
हेही वाचा..
उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!
संयुक्त राष्ट्रांत पहिल्यांदाच भारताचे इस्रायलविरोधात मत!
आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!
मोबाईल खाली पडला असे सांगत सी लिंकवरून मारली उडी!
संजय राऊत (बिना वातीचा फटाका) : दरम्यान याचवेळी संजय राऊत यांच्यासाठी कोणता फटाका घेणार, यावर बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले की, राऊत यांच्यासाठी विना वातीचा फटाका घेणार. वातच काढून घेतल्यास फटाका कधीच वाजत नसतो, असे दानवे म्हणाले.शरद पवार (डबल आवाज फटाका) : शरद पवार यांच्यासाठी आपण दोन वातीचा फटाका घेणार आहे. कारण, कोणत्या वातीचा कोठून आवाज येईल, आणि कोठून येणार नाही याबाबत काहीच सांगता येणार नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यासाठी डबल आवाज फटाका घेणार असल्याचे दानवे म्हणाले. राहुल गांधी (सुरसुरी) : राहुल गांधी यांच्यासाठी जर फटाका खरेदी करायचा असेल तर, लहान मुलं खेळतात ती सुरसुरी विकत घेईल. त्यांच्यासाठी सुरसुरी योग्य आहे. आवाज कधीच निघत नाही, फक्त चमकत असतो, असे दानवे म्हणाले.