27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरक्राईमनामाराज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल होणार

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल होणार

Google News Follow

Related

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात तपास करुन गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. कलम १५६/३ अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकरांनी बच्चू कडूंविरोधात तक्रार दाखल केली होती. बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्यातील तीन रस्त्यांमध्ये १ कोटी ९५ लाखांची आर्थिक अनियमितता केल्याला आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. याच आरोपांप्रकरणी जिल्हा न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी जानेवारी महिन्यात अकोला पोलिसांकडे तक्रार केली होती. पण पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही तक्रार केली होती. राज्यपालांनी तक्रार ऐकून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयात पुरावे सादर केल्यानंतर आता अकोला जिल्हा न्यायालयाने २४ तासांच्या आत तपास करुन गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

हे ही वाचा:

लहान मुलांच्या लसीकरणाला मंजुरी

संजय राऊत यांच्या विरोधात नागपूरमध्ये तक्रार

किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास शूट ऍट साईट!

उत्तर प्रदेशमध्ये १७ हजार लाऊडस्पीकरचा आवाज केला कमी

पालकमंत्री बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करत १ कोटी ९५ लाखांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामं पालकमंत्री कडूंनी डावलल्याचा आरोप करण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामं नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप केल्यानंतर यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या तीन रस्त्यांसह २५ कामांना स्थगिती दिली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा