राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संदर्भात मोठा निर्णय समोर आला आहे. बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावास आणि दंड ठोठावण्यात आला आहे. २०१४ च्या एका प्रकरणातील हा निकाल आहे. अमरावतीच्या चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, या प्रतिज्ञापत्रात बच्चू कडू यांनी मुंबईतील दोन फ्लॅट्सची माहिती दिली नसल्याचे समोर आले.
हे ही वाचा:
डॉक्टर घेणार हिप्पोक्रॅटिक ओथ ऐवजी चरक शपथ?
‘काँग्रेसची हुजुरी करण्यासाठी संजय राऊत वाटेल ते बोलू शकतात’
पत्रकार राणा अय्यूब यांची १.७७ कोटी रक्कम ईडीने गोठवली
खबरदार ! रेल्वेच्या दिव्यांग डब्यातून प्रवास कराल तर…
यासंदर्भात २०१७ मध्ये अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी अमरावतीच्या चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ अ अनवये गुन्हा सिद्ध झाला आहे. न्यायालयाने बच्चू कडू यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठवला. तसेच दोन महिने सक्षम कारावासाची शिक्षा दिली.