केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी, १० एप्रिलला गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी नडाबेट येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील बॉर्डर व्ह्यू पॉइंटचे उद्घाटन केले. पंजाबच्या वाघा-अटारी सीमेच्या धर्तीवर हा व्ह्यू पॉइंट तयार करण्यात आला आहे.
या व्ह्यू पॉइंटमध्ये, पर्यटकांना भारतीय सीमेवरील लष्करी चौकीचे कामकाज पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांना मावळत्या सूर्याचे सुंदर दृश्यही पाहता येणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, देशात प्रत्येक वेळी संकटे आली आहेत. त्यानंतर बीएसएफने शौर्य दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. इथे येण्याने मुलांच्या मनातही देशभक्तीची भावना निर्माण होते. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठीही पावले उचलली जात आहेत.
गुजरात की ये ऐतिहासिक सीमा BSF के उत्कृष्ट पराक्रम की साक्षी रही है।
कश्मीर में घुसपैठ रोकनी हो, नार्थ ईस्ट में आंतरिक सुरक्षा हो, क्रीक के दलदल में सजगता दिखानी हो विश्व में इतनी कठिन परिस्थितियों में काम करने वाला शायद ही दूसरा कोई बल होगा।
BSF देश की सुरक्षा की गारंटी है। pic.twitter.com/rdL3pQFyTF
— Amit Shah (@AmitShah) April 10, 2022
नडाबेटमध्ये व्ह्यू पॉइंट निर्माण झाल्याने गुजरातच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. गुजरात टुरिझमनुसार नडाबेटमध्ये आर्ट गॅलरी उभारण्यात आली आहे. याशिवाय बीएसएफला समर्पित एक संग्रहालयही तयार करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नबाबात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील व्ह्यूपॉईंटच्या उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते.
हे ही वाचा:
पत्राचाळीच्या व्यवहारातील मूळ पुरुष आणि ठाकरे कुटुंबाचा आहे जवळचा संबंध!
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलचा भाजपा करणार सत्कार! पाच लाखांचा पुरस्कारही जाहीर
पंढरपूरमध्ये पांडुरंगाने आशीर्वाद दिला, कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई देईल
‘कोल्हापूरची जागा हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसकडे जाऊ नये’
उद्घाटनापूर्वी, अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी रविवारी बनासकांठा येथील नाडेश्वरी माता मंदिरात प्रार्थना केली. यानंतर गृहमंत्री अमित शाह गांधी नगरमध्ये नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी गांधीनगरमध्ये गुजरात स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, गुजकोमासोलच्या कार्यालयाचे उद्घाटनही करतील