एमआयएमच्या वतीने इम्तियाझ जलील यांच्या पुढाकाराने राज्यात तिरंगा रॅली काढायला सुरुवात केली आहे. मुस्लीम समाजाचे आरक्षण आणि वक्फ बोर्डाची जमीन लाटल्याप्रकरणी एमआयएमने या मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र, पोलिसांनी दबाव आणून एमआयएमची यात्रा थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, चांदिवली येथील शाळेत सभेला परवानगी मिळाली असून एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी सभा घेतील अशी माहिती औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
शनिवारी सकाळी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली औरंगाबादहून मुंबईसाठी रवाना झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबईमध्ये पोहचणार असा पवित्रा या रॅलीने घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईच्या सीमेवर म्हणजेच मुलुंड चेकनाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नगरमध्ये हा मोर्चा अडवण्यात आला होता मात्र, नियमांचे उल्लंघन होणार नाही असे जलाल यांनी संगीताल्यावार हा मोर्चा पुढे सोडण्यात आला. मात्र, मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नाही त्यामुळे पोलिसांच्या नियामंचे उलंघन करू नये असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
हे ही वाचा:
सुप्रिया ताईंची शिकवणी न घेतल्याने नवाब मलिक नापास
सीडीएस बिपिन रावत यांना लष्करी सन्मानात निरोप, १७ तोफांची दिली सलामी
५७व्या वर्षी बोरिस जॉन्सन यांच्याकडे हलला सातव्यांदा पाळणा
ओमिक्रोन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी १२ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबईत मोर्चे, आंदोलन, सभेला परवानगी नाकारली आहे. मात्र, एमआयएमने आक्रमक भूमिका घेत मोर्चा काढणारच असा पवित्रा घेतला आहे. आम्ही सरकारला प्रश्न विचारायला जात असल्याने आम्हाला रोखण्यात येते असा आरोपही जलाल यांनी केला आहे.