एमआयएमचा आज मोर्चा निघणार? की पोलिस रोखणार?

एमआयएमचा आज मोर्चा निघणार? की पोलिस रोखणार?

शनिवार ११ डिसेंबरला एमआयएमने ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने मुस्लिम समाजाला आरक्षण आणि महाराष्ट्रातील वक्फ मालमत्तेच्या संरक्षणासाठी मुंबईत मोर्चा काढायचे ठरविले आहे. पण दुसरीकडे मुंबई पोलिसांनी १० डिसेंबरच्या रात्रीपासून १२ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चे, आंदोलने, रॅली यांना परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन दिवसांत कोणतेही आंदोलन घेता येणार नाही, असे मुंबई पोलिसांनी ठरविले आहे.

अमरावती, नांदेड, मालेगाव येथे झालेल्या आंदोलनाच्या आणि त्यानंतर झालेल्या दगडफेक, जाळपोळ या प्रकारातून धडा घेऊन मुंबईत आंदोलनाला परवानगी न देण्याचे मुंबई पोलिसांनी ठरविले आहे.

त्रिपुरात न झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रझा अकादमीने आंदोलन घेतले आणि त्यानंतर जाळपोळ, दगडफेक, तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यामुळे मुंबईत एमआयएमच्या आंदोलनाला मनाई करण्यात येईल, अशीच शक्यता आहे.

एमआयएमचे औरंगाबादमधील खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा मुंबईत निघणार आहे. त्याला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिलह्यातून लोक रॅलीच्या माध्यमातून मुंबईत धडकणार आहेत. जलील यांनी ही माहिती दिली आहे. स्वतः जलील औरंगाबाद येथून काही गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहेत. ताफ्यातील सर्व गाड्यांवर तिरंगा ध्वज असेल.

हे ही वाचा:

सुप्रिया ताईंची शिकवणी न घेतल्याने नवाब मलिक नापास

सीडीएस बिपिन रावत यांना लष्करी सन्मानात निरोप, १७ तोफांची दिली सलामी

‘आदित्य’ सूर्यावर जाणारच!

५७व्या वर्षी बोरिस जॉन्सन यांच्याकडे हलला सातव्यांदा पाळणा

 

त्रिपुरा घटनेनंतर महाराष्ट्रात जो प्रकार घडला ते प्रकरण महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच शेकले होते. त्यामुळे आता या आंदोलनाला परवानगी नाकारून पुन्हा त्या जाळपोळीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी मुंबई पोलिस घेत आहेत.

 

Exit mobile version