असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने पुन्हा एकदा मुस्लिम आरक्षणाची बांग दिली आहे. त्यासाठी ११ डिसेंबरला मुंबई येतेच मोठा मोर्चा काढला जाणार आहे. मंगळवार, २३ नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे भाषण करताना ओवैसी यांनी चालो मुंबईची हाक दिली आहे. या आधी औरंगाबाद अधून ओवैसींनी मुस्लिम आरक्षणासाठी समाजाला एकत्र येण्याची हाक दिली होती.
राज्यात मुसलमान समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही काळापासून मागणी जोर धरू लागली आहे. पण या आपल्या मागणीला घेऊन राज्यातील मुसलमान समाज आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या एमआयएम पक्षातर्फे या मागणीला घेऊन मुस्लिम समाजाला चिथावणी दिली जात आहे. एमआयएम पक्षाने या विषयात पुढाकार घेऊन आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढायचे ठरवले आहे. ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत येथे हा मोर्चा काढला जाणार आहे.
राज्यात मुसलमान समाज हा दलित समाजानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मागास समाज आहे. त्यामुळे मुसलमान समाजालाही आरक्षण मिळावे अशी भूमिका एमआयएम मार्फत मांडण्यात आली आहे. मुसलमान समाजाला राज्यात ५ टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी एमआयएमच्या पुढाकाराने आयोजित होणाऱ्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
यावेळी मुस्लिम आरक्षणाच्या मागणी सोबतच वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यात याव्यात अशीही मागणी केली जाणार आहे असे ओवैसी यांनी सांगितले. त्यामुळे डिसेम्बर महिन्यात ठाकरे सरकारसाठी ही मोठी समस्या उभी ठाकण्याची शक्यता आहे. तर मुस्लिम समाजाच्या या मागण्यांपुढे ठाकरे सरकार झुकणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.