24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणशरद पवार, राहुल गांधींना मुस्लिम मतं हवीत; पण आम्ही नको!

शरद पवार, राहुल गांधींना मुस्लिम मतं हवीत; पण आम्ही नको!

इंडिया आघाडीतून वगळल्यामुळे इम्तियाज जलीलचा आरोप

Google News Follow

Related

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून त्यानंतर येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीसाठीही राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य केलं आहे. एमआयएम पुढच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे ते म्हणाले. शिवाय कोण सोबत आलं तर सोबत घेऊ अन्यथा स्वबळावर निवडणूक लढू, असं इम्तियाज जलील म्हणाले.

इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. शरद पवार आणि राहुल गांधी यांना दोघांनाही मुस्लिम मतं हवी आहेत. मात्र, त्यांच्या बाजुला बसलेला इम्तियाज जलील नको आहे. भाजपाला पराभूत करायचं असेल तर आम्हाला कमजोर समजू नका. आमची पण ताकद आहे. इंडिया आघाडीत जे पक्ष घेतले त्यांची ताकद नाही. पण आम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

संसदेचे विशेष अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले. लोकसभेत याला मंजुरी मिळाली आहे. तर राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरु आहे. मतदानावेळी या विधेयकाला दोन नेत्यांनी पाठिंबा दिला नाही. असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. यावरही जलील यांनी आपलं मत मांडलं. सध्या घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात चाललं आहे. कोण कोणत्या पक्षात आहे, हेच कळत नाही. पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महिला आरक्षणाचा निर्णय घेण्यात आलं आहे, असं इम्तियाज जलील म्हणालेत.

हे ही वाचा:

मुस्लिम महिलांना आरक्षणात स्थान नसल्यामुळे विधेयकाला ओवैसींचा विरोध !

लष्करी अधिकारी-जवनांमध्ये फूट पाडू नका!

धावत्या टॅक्सिमध्ये गतिमंद मुलीवर बलात्कार !

खलिस्तानी दहशतवादी सुखदूल सिंग याची कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या

औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यात आलं आहे. त्यावरही इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा सरकारकडे काही नसतं तेव्हा शहरांची नावं बदलली जातात. शहरांची नावं बदलून काय साध्य करणार आहात? आमच्याकडे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री विमानाने आले आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घोषणा करुन गेले, असं म्हणत छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीवर इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा