एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला सत्तेसाठी एक खुली ऑफर दिली आहे. तुमचं तीन चाकाचं सरकार आहे, आम्हला त्यात सामिल करून चारचाकी करा, आम्हाला सोबत घ्या, असे आवाहन औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांना केले आहे. एमआयएमच्या समावेशानंतर सध्या तीनचाकी वाहनाप्रमाणे चालणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आणखी एक चाकाची भर पडेल आणि तोलही योग्य राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
जलिलांच्या या ऑफरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे नेते राजेश टोपे काल जलील यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी त्यांच्यात राजकीय चर्चा झाली.
यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “मी स्वत: समाजवादी पक्ष आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. पण मला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तुम्ही आमच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करत आहात, त्यामुळेच आम्ही तुमच्यासोबत यायचे आहे, असा प्रस्ताव मी उघडपणे मांडत आहे. आता आम्ही ऑफर केली आहे, तुमच्या उत्तराची वाट पाहत आहोत.”
हे ही वाचा:
“शिवसेनेने ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ यांना स्वीकारले आहे”
योगी आदित्यनाथ या दिवशी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
रशियाने युक्रेनवर सहा क्षेपणास्त्रे डागली
ओमर अब्दुल्ला म्हणाले होते, काश्मिरी पंडितांच्या अत्याचारास मुस्लिम जबाबदार!
येत्या काळात महापालिका निवडणूक होणार आहेत. त्या निवडणुकीतही सोबत लढण्याची तयारी जलील यांनी दर्शवली आहे. मात्र राजेच टोपे यांनी हा निर्णय आघाडीतील वरिष्ठ नेत्यांवर सोडला आहे. येणाऱ्या काळात महाविकास आघाडी काय भूमिका घेतेय याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.