मिलिंद घाग महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष

मिलिंद घाग महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्ष या पदावर मिलिंद घाग यांची नेमणूक करण्यात आली आहे. अमित ठाकरे यांनी मिलिंद घाग यांना पुष्पगुच्छ देऊन या पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजवर मांडलेले विचार ध्यानात ठेवूनच आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसंच शैक्षणिक संस्था यांना भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी आपल्या पिढीसमोरील विविध शैक्षणिक आव्हानांचा समस्यांचा अभ्यास आणि प्रसंगी आंदोलने करण्यासाठी तुम्ही सदैव सज्ज रहायलाच हवं. मला पूर्ण विश्वास आहे की, महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना’ अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ओळख निर्माण करण्यासाठी माझ्यासोबत तुम्हीही झपाटून काम कराल, असे पत्र देत मिलिंद घाग यांची निवड झाली आहे.

हे ही वाचा:

ही हिंदु्त्वाची लढाई आहे, आम्हाला पदे नको होती!

कन्हैयालाल हत्या प्रकरणातील आरोपीचा पाकिस्तानशी संबंध

उदयपूर मधील कन्हैयालालसाठी २४ तासात जमले १ कोटी

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे हे आहेत. आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद हे रिक्त होते. त्यामुळे या पदावर अमित ठाकरेंचीच नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी होत होती. त्यांनतर अमित ठाकरे हे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले.

Exit mobile version