30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारणईशान्य मुंबईत मिहीर कोटेचांचा पराभव बांगलादेशींमुळे

ईशान्य मुंबईत मिहीर कोटेचांचा पराभव बांगलादेशींमुळे

किरीट सोमय्यांनी आकडेच आणले समोर

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजपाचे मिहीर कोटेचा निवडून येऊ शकले नाहीत. कोटेचा हे हमखास निवडून येतील अशी अपेक्षा होती मात्र त्यांना मानखुर्दमधील मतांचा मोठा फटका बसल्याचे मत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

सोमय्या यांनी ट्विट करत ही आकडेवारी दिली आहे. बांगलादेशी मतदारांमुळे कोटेचा यांचा पराभव झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, भाजपाचे मिहीर कोटेचा हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून २९८६१ मतांनी पराभूत झाले. मानखुर्दमध्ये त्यांना ८७९७१ मते कमी पडली. तर मुलुंड ते घाटकोपरमध्ये त्यांना ५८११० मतांची लीड मिळाली. मानखुर्दमधून जिथे मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक राहतात तेथून उद्धव ठाकरे गटाला १ लाख १६ हजार ०७२ मते पडली. तर भाजपाला २८१०१ मते मिळाली. हा फरक आहे, ८७९७१ इतका. त्यामुळे आमचा पराभव हा बांगलादेशींनी केलेला आहे.

सोमय्या यांनी यासाठी आकडेवारी टाकली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुलुंडमध्ये कोटेचा यांना १ लाख १६ हजार ४२१ तर संजय दीना पाटील यांना ५५ हजार ९७९ मते पडली. म्हणजेच ६०४४२ मते कोटेचांना जास्त पडली.  विक्रोळीतून कोटेचा यांना ५२ हजार ८०७ मते तर संजय पाटील यांना ६८६७२ मते पडली. १५ हजार ८६५ मते कमी पडली.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी ९ जूनला तिसऱ्यांदा शपथ घेण्याची शक्यता

भाजपला आत्मचिंतन करायला लावणारे निकाल!

आता मविआची तयारी सिव्हिल वॉरची!

घोषणा ‘४०० पार…’चीनिकाल ३०० च्या आत… भाजपाचे गणित कुठे चुकले?

भांडुप विधानसभा मतदारसंघातून कोटेचा यांना ७५६५९ मते पडली आहेत तर संजय पाटील यांना ७९११७ मते पडली आहेत तो फरक ३४५८ मतांचा आहे. घाटकोपर पश्चिममधून कोटेचांना ६३३७० मते पडली तर संजय पाटील यांना ७९१४१ मते पडली. १५ हजार ७७२ मते कोटेचांना कमी पडली. घाटकोपर पूर्वेतून कोटेचा यांना ८३२३१ मते मिळाली तर संजय पाटील यांना ४९६२२ मते पडली. ३३६०९ जादा मते कोटेचांना मिळाली. मानखुर्द शिवाजीनगरमधून कोटेचा यांना २८ हजार १०१ मते पडली तर संजय पाटील यांना १ लाख १६ हजार ०७२ मते पडली अर्थात ८७ हजार ९७१ मते कमी पडली.

पोस्टल मतदानात कोटेचा यांना १४८७ मते पडली तर संजय पाटील यांना २३३३ मते पडली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा