टाळेबंदीच्या भीतीने मजूरांचे ‘गड्या आपुला गाव बरा’!

टाळेबंदीच्या भीतीने मजूरांचे ‘गड्या आपुला गाव बरा’!

Photo credit ANI

महाराष्ट्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाऊनच्या भितीने अनेक परप्रांतीय मजूरांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या विविध ठिकाणाहून उत्तर प्रदेश, बिहार इथे जाणाऱ्या गाड्या सुटतात. त्या टर्मिनलच्या बाहेर मजूरांनी गर्दी करायला सुरूवात केली आहे.

हे ही वाचा:

भारताला ‘हिंदूराष्ट्र’ घोषित करावे

क्राईम ब्रांच पाठोपाठ आता इओडब्ल्युच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाकरे सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे वसई- विरारमध्ये रुग्णांचा मृत्यु

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा

कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसच्या इथे मोठ्या प्रमाणात गावी परतणारे मजूर पहायला मिळाले. मागच्या वर्षी केलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली होती. त्याबरोबरच मुंबईत राहण्या- खाण्याचे हाल झाले होते. ती अवस्था परत ओढावू नये, म्हणून मजूर पुन्हा एकदा परत निघाले आहेत.

मध्य रेल्वेकडून मात्र लोकमान्य टिळक टर्मिनल समोरील गर्दी नेहमीसारखी असल्याचे म्हटले जात आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार कोणत्याही उन्हाळ्यात आढळणारी ही सामान्य गर्दी आहे. आज साधारणपणे लोकमान्य टिळक टर्मिनलवरून २३ गाड्यांचे प्रस्थान अपेक्षित आहे. यापैकी १६ गाड्या उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे जाणाऱ्या आहेत. त्यापैकी ५ या उन्हाळी विशेष गाड्या आहेत. त्यामुळे या विशेष गाड्या धरल्या तर ही उन्हाळ्यातील सामान्य गर्दी आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट केले आहे.

Exit mobile version