पॉर्नस्टार मिया खलिफाने पॉपस्टार रिहानाबरोबरच ट्विट करून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. यानंतर अनेक भारतीय कलाकार आणि खेळाडूंनी अशा प्रकारे परदेशातून ट्विट करणाऱ्यांविरोधात #IndiaTogether या हॅशटॅगवर ट्विटही केले. परंतु आता पुन्हा एकदा मिया खलिफाने या विषयावर ट्विटकरून भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा या विषयावर कधी बोलणार? असा सवाल केला आहे.
पॉर्नस्टार मिया खलिफाने शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर ट्विट केल्यानंतर भारतातून याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांनी याच्या विरोधात ट्विट करून भारत आंतरिक मुद्द्यांवर तोडगा काढायला समर्थ असल्याचे सांगितले होते. आता पुन्हा एकदा मिया खलिफा यांनी या विषयावर ट्विट केले आहे, प्रियांका चोप्रा या विषयावर काही बोलणार आहेत का? त्यांच्या या विषयावरील शांततेचे कारण काय? असा सवाल त्यांनी या ट्विटमधून केला आहे.
गेल्या आठवड्यातच पॉर्नस्टार मिया खलिफा अनेक आंतरराष्ट्रीय ‘सेलिब्रेटीज’सोबत या आंदोलनावर ट्विट करणाऱ्यांमध्ये सामील झाली. यामध्ये पॉपस्टार रिहाना, शालेय वयातील पर्यावरणप्रेमी ग्रेटा थंबर्ग यांचाही समावेष होता. यातील ग्रेटा थंबर्ग यांनी आंदोलनासाठीचे एक ‘टूलकिट’ चुकून ट्विट केले. ज्यामध्ये आंदोलन कसे करावे, २६ जानेवारीला काय करावे? कोणाला संपर्क साधावा? या सगळ्याची माहिती होती. नंतर त्यांनी हे ट्विट डिलिट केले आणि त्यातील माहिती जुनी असल्याने डिलीट केल्याचे कारण दिले.