मेहबुबा मुफ्तींच्या निकटवर्तीचे दहशतवाद्यांशी संबंध?

मेहबुबा मुफ्तींच्या निकटवर्तीचे दहशतवाद्यांशी संबंध?

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे निकटवर्तीय वाहिद-उर-रहमान पर्रा यांनी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांशी झालेल्या चर्चेचा तपशील जम्मू-काश्मीर पोलिसांनी गूगलला विचारला आहे. पर्राविरोधात दाखल आरोपपत्रात पोलिसांनी हे सांगितले. त्याचबरोबर मुफ्ती यांनी म्हटले आहे की पर्रावर लावलेले आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत. पर्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांच्या काऊंटर इंटेलिजेंस काश्मीर (सीआयके) शाखेकडून हे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

श्रीनगरच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या १९पानांच्या आरोपपत्रात असे म्हटले आहे की, “पर्रा यांच्यावर खटला चालविण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. यावरून हे सिद्ध होते की त्याने आपल्या राजकीय लाभासाठी दहशतवाद्यांचा पाठिंबा दर्शविला आहे. या बदल्यात त्यांनी युती केली. त्यांच्या मदतीसाठी, त्यांना दहशतवादी हल्ले करण्यासाठी विविध प्रकारे मदत केली. ”

हे ही वाचा:

आंदोलनात पोलिसांवर ‘भाई’ गिरी

वडेट्टीवारांनी पुन्हा केले मुख्यमंत्र्यांचे काम हलके

पटोलेंना व्हावेसे वाटते मुख्यमंत्री; मग उद्धव ठाकरेंचे काय?

ख्वाजा मेरे ख्वाजा…बीएमसी दिला जा

आरोपपत्रात पुढे असेही म्हटले आहे की, “चौकशी दरम्यान असे आढळले की आरोपी पाकिस्तान आधारित फुटीरतावादी आणि दहशतवादी नेत्यांकडून सूचना व सल्ले घेत असत आणि दहशतवाद आणि फुटीरतावाद वाढविण्यासाठी अनेक माहिती आणि कारवाईचे अहवाल पाठवत असे.”

जून महिन्याच्या सुरूवातीस श्रीनगरच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की पर्रा अनेक ईमेल आयडीद्वारे माहिती सामायिक करीत असे, त्यापैकी तीन ईमेल आयडी शोधण्यात आल्या. “त्यानुसार, गूगल अमेरिकेला त्याच्या तीन ईमेल आयडीद्वारे पर्राने पाठविलेल्या ईमेलची माहिती देण्याची विनंती केली आहे,” असे पोलिसांनी सांगितले.

पीडीपी अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आरोप केला आहे की पोलिसांनी पर्रावर “अत्याचार” केले आहेत आणि पोलिसांनी त्याला “अमानुष परिस्थितीत” ठेवले आहे.
पोलिसांनी पर्रावर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्याच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. “गुगल अमेरिकेला पर्राचा ईमेल डेटा सुरक्षित ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे,” असे आरोपपत्रात म्हटले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सीआयडी सेलच्या सीआयकेनेही गुगलला पर्राच्या मोबाइल फोनशी जोडलेले आयक्लॉऊड अकाऊंटमध्ये व्हॉट्सॲप चॅट्स आणि डेटा उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे आणि त्याच्या तपशीलची वाट पाहत असल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे. पर्रा यांच्याविरूद्ध हे दुसरे आरोपपत्र आहे

Exit mobile version