महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर, गृहखाते फडणवीसांकडेच, शिंदेकडे नगरविकास खाते

अजित पवार अर्थमंत्री, धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री

महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर, गृहखाते फडणवीसांकडेच, शिंदेकडे नगरविकास खाते

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर गेले काही दिवस खातेवाटप कधी होणार याची चर्चा होती. त्यावरून सरकारला सवाल उपस्थित केले जात होते. अखेर नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यावर हे खातेवाटप जाहीर झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे गृहखाते आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आहे.

महायुतीतील ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यात १९ मंत्रीपदे भाजपकडे तर ११ मंत्रीपदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे ९ मंत्रीपदे देण्यात आली आहेत.

त्यात महसूल खाते भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर उद्योग खाते उदय सामंत यांच्याकडे आहे. सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हे खाते असून पंकजा मुंडे यांना पर्यावरण खाते सोपवण्यात आले आहे. माणिकराव कोकाटे याना कृषी खाते देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे याना जलसंपदा, हसन मुश्रीफ याना वैद्यकीय शिक्षण, चंद्रकात पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण, आशिष शेलार याना माहिती व तंत्रज्ञान, गिरीश महाजन याना जलसंधारण खाते देण्यात आले आहे. नितेश राणे यांना मत्स्य आणि बंदरे हे खाते देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्राला प्रगत, समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार अहोरात्र काम करेल

पाकमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ची केंद्रे सोयीसुविधांनी सुसज्ज; फ्रेंच मॅगझिनमध्ये धक्कादायक खुलासे

रशियातील कझान शहरात ड्रोन हल्ला; तीन इमारतींना केले लक्ष्य

बांगलादेशात तीन हिंदू मंदिरांतील मूर्तींची विटंबना; अलाल उद्दीनला ठोकल्या बेड्या

५ डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शपथविधीनंतर देखील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.

हिवाळी  अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. अधिवेशन सुरू असताना मंत्र्यांना खाते वाटप होईल अशी अपेक्षा होती. मात्र अखेर आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे.

असे आहे खातेवाटप

देवेंद्र फडणवीस – गृह

अजित पवार – अर्थ

एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

गणेश नाईक – वन मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा

पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा

दादा भुसे – शालेय शिक्षण

गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

संजय राठोड – मृद व जलसंधारण

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

जयकुमार रावल – विपणन, शिष्टाचार

अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण

अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक

शंभुराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

माणिकराव कोकाटे – कृषी

दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

संजय सावकारे – कापड

संजय शिरसाट – सामाजिक न्याय

प्रताप सरनाईक – वाहतूक

भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन

मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

आकाश फुंडकर – कामगार

बाबासाहेब पाटील – सहकार

प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

योगेश कदम – गृहराज्य शहर

पंकज भोयर – गृहनिर्माण

Exit mobile version