महाराष्ट्रात सातत्याने सुरू असलेला भरती परीक्षांचा गोंधळ काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आरोग्य भरती परीक्षांच्या गोंधळाचे प्रकरण ताजे असतानाच आता ‘म्हाडा’ च्या परीक्षेचा गोंधळ समोर आला आहे. रविवार, १२ डिसेंबर रोजी होणारी ‘म्हाडा’ ची भरती परीक्षा अचानक पणे पुढे ढकलण्यात आली आहे. शनिवार, ११ डिसेंबर रोजी रात्री उशिरा महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे.
ट्विटरवर एक व्हिडिओ संदेश पोस्ट करत आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे. परीक्षार्थींना होणाऱ्या त्रासासाठी आव्हाड यांनी क्षमा देखील मागितली आहे. पण परीक्षांच्या या सततच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा संताप होताना दिसत आहे. तर ठाकरे सरकारच्या भोंगळ कारभारावर राज्यातील विद्यार्थी टीका करताना दिसत आहेत.
म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
उद्या परीक्षा होणार नाही pic.twitter.com/ewR8XrWe0G— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021
हे ही वाचा:
मुंबईत १४४ ‘कलम’; एमआयएमच्या सभेला गर्दी
सौदी अरबमध्ये तब्लिघी जमातवर बंदी
‘ओबीसी आरक्षण संपवण्याचा ठाकरे सरकारच्या षडयंत्राचा डाव उघड’
…म्हणून पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक झाले?
रात्री सुमारे दोन वाजता आव्हाड यांनी ‘म्हाडा’ च्या वेबसाईटवर तसेच त्यांच्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मी सर्वा विद्यार्थ्यांची क्षमा मागतो, पण काही अपरिहार्य कारणांमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे ‘म्हाडा’ ची उद्याची (रविवार, १२ डिसेंबरची) परीक्षा तसेच इतर सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात घेतल्या जातील असे आव्हाड यांनी सांगितले. परीक्षार्थींनी आपले गाव ठिकाण सोडू नये आणि केंद्रावर पोहोचू नये यासाठी आपण एवढ्या रात्री हा व्हिडिओ पोस्ट करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
पण असे असले तरी विद्यार्थ्यांना सरकारच्या कारभारामुळे सततचा मनस्ताप होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक विद्यार्थी आदल्या रात्रीच केंद्राच्या ठिकाणी पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा संताप अनावर झालेला पाहायला मिळत आहे.