‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांचा भाजपा प्रवेश

‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांचा भाजपा प्रवेश

केरळ विधानसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी भारताचे ‘मेट्रोमन’ अशी प्रतिमा असलेले इ. श्रीधरन यांनी लवकरच भाजपमध्ये करणार असल्याचे सांगितले आहे. “बातमी खरी आहे. मी भाजपमध्ये सामील होणार आहे.” असे ई. श्रीधरन यांनी सांगितले.

या निर्णयामागील कारण विचारले असता ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून ते केरळमध्ये राहत आहेत आणि राज्यात विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले परंतु त्यांना राजकीय प्रतिकारांचा सामना करावा लागला. “मी केरळमध्ये गेली १० वर्षे राहत आहे, परंतु मी पाहिले आहे की राज्याच्या वाढीची नव्हे तर एलडीएफ आणि यूडीएफला केवळ त्यांच्या राजकीय वाढीची चिंता आहे. या परिस्थितीत केवळ भाजपाच राज्यासाठी काही करू शकेल.” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

जेपी नड्डा केरळ दिग्विजयावर

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या सर्वात चांगल्या पंतप्रधानांपैकी एक आहेत. त्यांच्यासोबत जवळून काम करण्याची संधीही मला मिळालेली आहे.” असे ई. श्रीधरन यांनी सांगितले. नरेंद्र मोदी आणि त्यांचे काम यातून प्रेरित होऊनच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

भाजपचे केरळ मधील प्रदेश अध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या नेतृत्वात असलेल्या विजय यात्रेदरम्यान ते अधिकृतपणे पक्षात प्रवेश करतील. केरळच्या उत्तर जिल्ह्यातील कासारगोड येथून २१ फेब्रुवारीपासून या रॅलीला सुरुवात होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील.

Exit mobile version