काँग्रेसच्या घुसखोरीला सावरकर स्मारकाच्या सदस्यांचा विरोध

काँग्रेसच्या घुसखोरीला सावरकर स्मारकाच्या सदस्यांचा विरोध

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीची आता चर्चा सुरू झाली आहे. रविवार, २६ डिसेंबरला ही निवडणूक होत असून त्यात महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित तसेच काँग्रेसचे नेते दीपक टिळक यांच्यात लढत होणार आहे. मात्र काँग्रेसची घुसखोरी स्मारकात होऊ दिली जाणार नाही, असा निश्चय स्मारकाच्या सदस्यांनी केला आहे.

या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित उतरले आहेत. त्यांनी सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार अधिक व्यापक करण्याचा मनोदय बोलून दाखविला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू दीपक टिळक हेदेखील उभे आहेत. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेसने सातत्याने सावरकरांचा तीव्र विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेसकडून सावरकरांची सातत्याने बदनामीही करण्यात आली आहे. स्वतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे. अशा पार्श्वभूमीवर दीपक टिळक यांच्या उमेदवारीवरून सदस्यांमध्ये नाराजी आहे.

प्रवीण दीक्षित यांनी न्यूज डंकाशी बोलताना म्हटले आहे की, सावरकरांच्या विचारांच्या प्रसाराचे कार्य अधिक गतीने करण्याचा माझा प्रयत्न असेल. स्वातंत्र्यवीरांचे हे राष्ट्रीय स्मारक अधिक अत्याधुनिक व्हावे यासाठी आम्ही सगळे सावरकर प्रेमी प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

… म्हणून कोरोना मृतांच्या यादीत चक्क जिवंत माणसे!

सुरू झालेल्या शाळेत लसीकरण केंद्र

भारत- पाकिस्तान सीमेजवळ मिग विमानाचा अपघात; विंग कमांडरचा मृत्यू

‘अटलजींनी देशाला प्रभावशाली आणि विकसित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले’

 

दीपक टिळक यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर स्मारकाच्या कारभारावर आरोप केले होते. पण स्मारकाचे कार्याध्यक्ष व सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी त्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे एकूणच ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

यासंदर्भात स्मारकातील विश्वस्त शैलेंद्र चिखलकर यांनी म्हटले आहे की, दीपक टिळक उभे का राहात आहेत हा मुख्य प्रश्न आहे. स्मारकाचे जे कार्य चालले आहे. ते सावरकरांच्या विचारांचे कार्य आहेच, पण अन्य क्रांतिकारकांनी देशासाठी काय केले त्यावरही सावरकर स्मारक काम करत असते. मूळची काँग्रेस ही नेहरू, गांधी किंवा आपल्या नेत्यांना पुरस्कृत करतात, बाकीच्यांना ते सन्मान देत नाहीत. केवळ सावरकरच नव्हे तर चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांचीही दखल काँग्रेसने घेतलेली नाही. अशी विचारधारा बाळगणाऱ्यांनी स्मारकात येताच कामा नये. त्यामुळे आमचा काँग्रेसच्या या निवडणुकीतील सहभागाला आमचा तीव्र विरोध आहे.

Exit mobile version