तबलिगी जमातच्या ४९ नागरिकांनी त्यांच्याविरोधात असलेले आरोप कबुल केले आहेत. लखनऊ येथील न्यायालयात त्यांनी या आरोपांची कबुली दिली असून न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे.
वर्षभरापूर्वी दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज येथे तबलिगी जमातचा कार्यक्रम झाला होता ज्यात कोविड नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी परदेशातून अनेक तबलिगी आले होते. देशात विविध ठिकाणी या लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी ४९ तबलिगी हे उत्तर प्रदेश मध्ये दाखल झाले होते. थायलंड, बांगलादेश, कझाकस्तान आणि किर्गिजिस्तान या चार देशांचे हे नागरिक आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता आणि साथ रोग प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हे ही वाचा:
मालवणीत मध्यरात्री घरासमोर येऊन जिहादी टोळके म्हणाले, रोहनला आमच्या ताब्यात द्या….
आपली बाजू मांडताना या नागरिकांनी आपण परदेशी नागरिक असून अधिकृत व्हिजावर भारतात आल्याचे सांगितले. पण सोबतच कायदेभंग केल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. न्यायालयाने आजवर त्यांनी कोठडीत घालवलेले दिवस आणि त्यावर प्रति व्यक्ती पंधराशे रुपये इतका दंड अशी शिक्षा ठोठावून त्यांची मुक्तता केलेली आहे. चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सुशील कुमारी यांच्या कोर्टाने हा निर्णय दिला आहे.