मेहबुबा मुफ्ती यांच्या मुलीने स्वीकारला विधानसभा निवडणुकीतील पराभव?

ट्रेंडमध्ये पिछाडीवर असलेल्या इल्तिजा यांनी एक्सवर केली पोस्ट

मेहबुबा मुफ्ती यांच्या मुलीने स्वीकारला विधानसभा निवडणुकीतील पराभव?

जम्मू- काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर २०२४ मध्ये पहिल्यांदाचं विधानसभेच्या निवडणुका पाट पडल्या. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या एकूण ९० जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झालं. याचा निकाल मंगळवार, ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून राज्यातील सरकार कोणाच्या हाती जाणार हे स्पष्ट होणार आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स- काँग्रेसची युती, महबूबा मुक्ती यांचा पक्ष पीडीपी आणि भाजपा यांच्यात मुख्य लढत आहे. निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत असतानाच आता काश्मीरमधून मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा हिच्याबाबत नवी माहिती समोर आली आहे. बिजबेहारा मतदारसंघाच्या जागेवर पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती निवडणूक रिंगणात आहेत. या जागेवर इल्तिजा मुफ्ती यांच्याविरोधात भाजपच्या सोफी युसूफ आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या बशीर अहमद शाह मैदानात आहेत. मात्र, सुरुवातीपासून इल्तिजा मुफ्ती या ट्रेंडमध्ये पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच त्यांनी आता विधानसभा निवडणुकीत आपला पराभव मान्य केल्याचे बोलले जात आहे.

जम्मू आणि काश्मिर विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्येने विधानसभा निवडणुकीत आपला पराभव मान्य केला आहे. एक्सवर पोस्ट करत इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या, “जनतेचा निर्णय मला मान्य आहे. बिजबेहरामधील सर्वांकडून मला मिळालेले प्रेम आणि आपुलकी सदैव माझ्यासोबत राहील. माझ्या पीडीपी कार्यकर्त्यांचे आभार ज्यांनी या निवडणुकीत खूप परिश्रम घेतले.”

हे ही वाचा : 

बांगलादेशात दुर्गा पूजेला सुरुवात, अमेरिकेने हिंदूंच्या संरक्षणाचे केले आवाहन!

पहिल्या दिवशी १५ हजार मुंबईकरांनी केला मेट्रो- ३ भुयारी मार्गावरून प्रवास

अविवाहित स्त्री वेश्येपेक्षा वेगळी नाही, झाकीर नाईक बरळला

स्त्री शक्तीचा जागर: राष्ट्र सेविका केळकर मावशी

बिजबेहरा ही जागा गेल्या २५ वर्षांपासून मुफ्ती कुटुंबाचा आणि त्यांचा पक्ष पीडीपीचा बालेकिल्ला आहे. येथून विजयी झाल्यानंतर मुफ्ती मोहम्मद सईद आणि त्यांची कन्या मेहबूबा मुफ्ती जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री बनले आहेत. यावेळी बिजबेहारा जागा जिंकण्याची जबाबदारी इल्तिजा मुफ्ती यांच्याकडे देण्यात आली होती.

Exit mobile version