मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत

मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत

जम्मू काश्मीर राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पिडीपी पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुक्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. काश्मीरमध्ये वाढत चाललेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मेहबूबा मुफ्ती यांना त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले असून अनिश्चित काळासाठी त्या नजर कैदेत असतील.

गेले काही दिवस जम्मू काश्मीर येथे सुरक्षा दलांनी धडक मोहिम चालवली आहे. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या कारवाईवर मुफ्ती या सातत्याने टीका करताना दिसत आहेत. अतिरेकी आणि सुरक्षा दलांच्या चकमकीत दोन सामान्य नागरिकांचा गोळ्या लागून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच काश्मिरमध्ये घडली. त्यावरून तिथले स्थानिक राजकारण तापताना दिसत आहे.

हे ही वाचा:

तळपत्या ‘सूर्या’ च्या किवींना झळा

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर फरार

मुंबईत हिवसाळा; दक्षिण मुंबईत पावसाने लावली जोरदार हजेरी

मोदी पंतप्रधान झाल्यापासून महिलांची सैन्यातील भूमिका वाढली

या घटनेच्या विरोधात मृतांच्या कुटूंबीयांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मेहबुबा मुफ्ती सहभागी होणार होत्या. त्या जम्मू येथून या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाल्या होत्या. हैदरपोरा येथे हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी जात असतानाच मेहबुबा मुफ्ती यांना रोखण्यात आले. तर त्यानंतर त्यांना तात्काळ नजरकैदेत ठेवण्यात आले.

ही नजरकैद अनिश्चित काळासाठी असणार आहे. त्यामुळे आगामी काळात या विषयावरून नवे राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मेहबुबा यांच्या भावाला ईडीने समन्स पाठवले आहे. मनी लाॅन्डरिंग प्रकरणात त्याची चौकशी होणार आहे.

Exit mobile version