अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर सारे जग चिंताक्रात आहे. पण भारतातील काही नेते मात्र या परिस्थितीचा वापर करून आपली राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करताना दिसत आहेत. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती ह्यांनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीचे उदाहरण देत केंद्र सरकार विरोधात टिप्पणी केली आहे. ‘आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका…ज्या दिवशी आमची सहनशक्ती संपेल, तुम्ही देखील शिल्लक राहणार नाही.’ अशी मुक्ताफळे मेहबूबा मुफ्ती यांनी उधळली आहेत.
‘जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा पुन्हा प्रदान करावा यासाठी मेहबूबा मुफ्ती आणि काश्मीर मधले अनेक नेते आग्रही आहेत. याबद्दलच भाष्य करताना मेहबूबा मुफ्ती असे म्हणाल्या की सरकारने जम्मू काश्मीर मधील नागरिकांशी चर्चा सुरु करावी. केंद्र सरकारला जर काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर त्यांनी राज्याला विशेष दर्जा पुन्हा बहाल करावा. कलम ३७० पुन्हा लागू करावे.’ कुलगाम येथे आयोजीत एका सभेत मेहबूबा मुफ्ती बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी ही मुक्ताफळे उधळली.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही
हिंदुत्वाचे महामेरू कल्याण सिंह कालवश
कल्याण सिंह यांच्या निधनानाने उत्तर प्रदेशात ३ दिवसांचा दुखवटा
पंतप्रधान मोदींचे खास संस्कृत ट्विट! म्हणाले…
तालिबानने अमेरिकेला पळवून लावले
तालिबानने अमेरिकेला अफगाणिस्तानातून पळून जाण्यास भाग पाडले. पण संपूर्ण जग तालिबान्यांच्या वागण्यावर लक्ष ठेवून आहे. मी तालिबानला थांबण्याचे आवाहन करते की त्यांनी असे काहीही करू नये की जेणेकरून जागतिक समुदाय त्यांच्या विरोधात जाण्यास भाग पडेल. तालिबानमधील बंदुकांची राजवट संपली आहे आणि आता ते लोकांशी कसे वागतील यावर जागतिक समुदाय लक्ष ठेवून आहे.