“पुण्यातल्या वानवडी येथील १४ वर्षीय लेकीवर अंगाचा थरकाप उडेल असा सामूहिक पाशवी अत्याचार झालाय. मुलीवर उपचार सुरु असून ती गंभीर आहे रिक्षाचालक तिला रिक्षातून नेतो काय पुढे ५-६ रिक्षा चालक पाशवी अत्याचार करतात २ रेल्वेचे कर्मचारीही त्यात सहभागी होतात. आरोपींना पुणे पोलिसांनी अटकही केलीय राज्यात अत्याचारांची परिसीमा झालीये.”
“एकीकडे गृहविभाचा काडीचाही वचक न राहिलेल्या आणि दुसरीकडे मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने आम्ही ही असेचं बाहेर येऊन फिरू शकतोयं हे निर्ढावलेपणं विकृतांना आलंय हे नक्की. मुख्यमंत्रीजी लक्ष द्या”, असं ट्विट करत वानवडी प्रकरणावर बोलताना त्यांनी मेहबूब शेख यांच्यावरही निशाणा साधला.
पुण्यातल्या वानवडी बलात्कार प्रकरणावर बोलताना भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ संतापल्या आहेत. राज्यात अत्याचारांची परिसीमा झालीये असा आरोप करत मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली आहे. दुसरीकडे कालपासून राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि चित्रा वाघ यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगलाय. वानवडी प्रकरणावर बोलताना त्यांनी मेहबूब शेख यांचं नाव घेताना, त्याच्यासारखे बलात्कारी मोकाट फिरतायत, त्यामुळे विकृतांना बळ येत असल्याची घणाघाती टीका केली आहे.
पुण्यातील वानवडी भागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून १४ वर्षीय मुलीचं अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
आरोपींना @PuneCityPolice अटकही केलीय राज्यात अत्याचारांची परिसीमा झालीये
एकीकडे गृहविभाचा काडीचाही वचक न राहिलेल्या आणि दुसरीकडे मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने आम्ही ही असेचं बाहेर येऊन फिरू शकतोयं हे निर्ढावलेपणं विकृतांना आलंय हे नक्की@CMOMaharashtra जी लक्ष द्या— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 7, 2021
प्रशांत सॅमियल गायकवाड (टीएलअँडएसी, विद्युत विभाग, पुणे स्थानक) आणि राजकुमार रामनगिना प्रसाद (इलेक्ट्रिक आणि देखभाल, विद्युत विभाग, पुणे स्थानक) अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणात या दोघा रेल्वे कर्मचाऱ्यांसह एकूण आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
हे ही वाचा:
… तर जावेद अख्तरना शबानासोबत पानाची टपरी लावावी लागली असती
जिओ धन धना धन! आणणार सगळ्यात स्वस्त स्मार्ट फोन
पंजशीरमध्ये पाडलं पाकिस्तानचं विमान
एका दिवसात एक कोटी लसीकरणाची भारताची हॅटट्रिक
पीडित १४ वर्षीय मुलगी ही ३१ ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.