देशात कोविडची परिस्थिती गंभीर होत आहे. त्यासाठी केंद्राकडून विविध प्रकारच्या उपाययोजना देखील राबवल्या जात आहेत. याच कारणामुळे कोविडवर आळा घालण्यात कमी पडणाऱ्या राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची बैठक होणार आहे.
देशातील अनेक राज्यांत कोविड महामारीने कहर केला आहे. औषधे, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन यांचा काही राज्यांत तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने राज्यांना मदत करत आहे. मात्र काही राज्यं तरीही कोविडशी दोन हात करण्यात कमी पडताना दिसत आहेत. अशा राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी केंद्रीय आरोग्यमंत्री आज बैठक घेणार आहेत. ही बैठक जम्मू आणि काश्मिर, उत्तराखंड, हरयाणा, पंजाब, बिहार, झारखंड, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत होणार आहे.
हे ही वाचा:
व्यापाऱ्यांचे तब्बल ५० हजार कोटींचे नुकसान, अनलॉक होणार?
संभाजी ब्रिगेडकडून राष्ट्रवादीला घरचा आहेर
२-१८ वयोगटातील मुलांसाठी होणार लसीची चाचणी
देशातील रुग्णवाढ आटोक्यात आणण्यासाठी वेगाने लसीकरण करायला सुरूवात केली गेली आहे. भारताच्या लसीकरणाची मदार कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींवर आहे. मात्र यासोबत आता रशियाने तयार केलेली स्पुतनिक लस देखील दाखल झाली आहे. त्याशिवाय इतरही चार लसी भारताच्या मार्गावर आहेत.
लसीकरणात राज्य सरकारांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. मात्र महाराष्ट्रात सातत्याने राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे लसीकरणात अडथळे येत आहे .