25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरराजकारणमीरा चोप्रा लसीकरण प्रकरण, कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची भाजपाची मागणी

मीरा चोप्रा लसीकरण प्रकरण, कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची भाजपाची मागणी

Google News Follow

Related

अभिनेत्री मीरा चोप्रा हिच्या नियमबाह्य लसीकरणाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर ठाण्यातील पार्किंग प्लाझा या कोविड सेंटरचे व्यवस्थापन बघणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करावे अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे आणि ठाणे महानगरपालिकेतील भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे दिले आहे.

ठाकरे सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्रात कोविड लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरू असलेला दिसत आहे. लसीची कमतरता असल्याचे कारण पुढे करत सरकारने सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवरचे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण हे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तरीही ठाण्यातील शासनाच्या लसीकरण केंद्रावर अभिनेत्री मीरा चोप्रा हिला कोविड लस देण्यात आली आणि नवा वाद सुरू झाला. त्यानंतर मीरा चोप्रा हिचे फ्रंटलाईन वर्कर असल्याचे एक बनावट ओळखपत्र समोर आले. या ओळखपत्रात मीरा चोप्रा ही पार्किंग प्लाझा या कोविड सेंटरची सुपरवायझर असल्याचे म्हटले आहे. या ओळखपत्राच्या आधारेच मीरा हिचे सरकारी लसीकरण केंद्रावर लसीकरण झाले असल्याची बाब उघड झाली. मीरा चोप्रा हिने हे सारे आरोप फेटाळले असले तरीही यावरून भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेली दिसत आहे.

हे ही वाचा:

‘कारुळकर’ बनले वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमचे सदस्यत्व मिळविणारे पहिले भारतीय दांपत्य

स्पुतनिकची पहिली खेप आज भारतात पोहोचणार

मुंबई महापालिका निवडणुका होणार! निवडणूक आयोगाचा हिरवा कंदिल

काँग्रेस नेत्याची आता थेट भोसले राजघराण्याकडून वसूली

सुरुवातीपासूनच भाजपाने मीरा चोप्राच्या लसीकरण आवरून ठाणे महानगरपालिकेला जाब विचारला होता. सत्ताधारी शिवसेनेला लक्ष करताना भाजपाने या लसीकरणावर सडकून टीका केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नेटकऱ्यांनी मीरा चोप्राच्या लसीकरणावरून अनेक सवाल उपस्थित केले होते. अखेर या सार्‍या दबावापुढे महानगरपालिकेला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमावी लागली आहे. पण तरीही जिथे अभिनेत्री मीरा चोप्रा हिचे लसीकरण झाले. त्या पार्किंग प्लाझा या सेंटरचे व्यवस्थापन बघणाऱ्या ओम साई हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आली आहे. भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि ठाणे महानगर पालिकेतील भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी यासंबंधीचे निवेदन आयुक्तांना दिले आहे. यावेळी नगरसेवक मिलिंद पाटणकर, नारायण पवार, आणि भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष सुजय पत्की उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा