प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज उभारलं जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच कोरोना काळात आपल्याला आलेल्या अनुभवानंतर आपण हा निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

साम टीव्हीच्या सामर्थ्य महाराष्ट्राचे वेध भविष्याचा मंथन विकासाचे या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. कोरोना काळात आपल्याला अनुभव आला होता की, डॉक्टरांची संख्या कमी होती. त्यामुळेचं आपण हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. सरकारकडून काही चुकलं तर माध्यमांना सांगण्याचा अधिकार आहे, पण सरकारने चांगलं काम केलं तर तेही आपण सांगणं गरजेचं आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

हेही वाचा :

म्हणून अरुण गवळी येणार तुरुंगाबाहेर!

जलतरणपटू स्वप्नील,अविनाशला ‘अर्जुन’ आणि रोहित शर्माचे प्रशिक्षक लाड यांना ‘द्रोणाचार्य’

हत्येपूर्वी श्रद्धाने दिली होती मित्राला हत्येची माहिती

गुजरातच्या एकमेव राष्ट्रवादीच्या आमदाराचाही राजीनामा

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही बाळसाहेबांची भूमिका आहे. बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही सरकार बनवले आहे. ती भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. सरकार विकासाची जपणूक करण्यासाठी असावं. आमचं सरकार येऊन तीन चार महिने झालेत तरी लोकांना बदल जाणवत आहे. हे सरकार लोकांसाठी काम करणारं आहे. आमचं काम २४ तास सुरू असतं, महाराष्ट्र आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Exit mobile version