‘समाजसेविका’ मिया खलिफा शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात

‘समाजसेविका’ मिया खलिफा शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात

अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका रिहाना, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध शाळकरी पर्यावरण प्रेमी ग्रेटा थुंबर्ग आणि पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी शेतकरी आंदोलनावर ट्विट केले आहे. या विषयावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक परित्रक काढले आहे. भारत सरकारने या प्रसिद्ध ‘सेलिब्रेटींच्या’ ट्विट करण्यावर पहिल्यांदाच एवढी मोठी आणि तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने एक परिपत्रक काढून “समाज माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी माहिती न मिळवता भारतातील आंदोलनाच्या विरोधात बोलण्यापासून सेलिब्रेटीजनी स्वतःला रोखले पाहिजे.”

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ट्विटद्वारे सांगितले.

“आम्ही हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की, भारतातील आंदोलने ही भारतातील लोकशाही व्यवस्था आणि लोकशाही पद्धतीने पारित केलेले कायदे याचबरोबर भारत सरकार आणि आंदोलनकर्त्या युनियन्सच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकी या सर्व गोष्टींचा विचार करूनच शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर भाष्य करावे.” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या परिपत्रकातून सांगण्यात आले आहे.

“भारतातील एका छोट्या भागातील काही शेतकऱ्यांना या कृषी कायद्यांबाबत अजून शंका आहेत.” असेही या परिपत्रकातून सांगण्यात आले. “आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आदर करून सरकारने हे कायदे तात्पुरते बाजूला ठेवण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे. असा प्रस्ताव थेट भारतीय पंतप्रधानांकडून देण्यात आला आहे.” असेही मंत्रालयाने सांगितले.

Exit mobile version