किशोरी पेडणेकरांनी दिले वेगळे वळण… म्हणतात, यशवंत जाधव हे भीमपुत्र आहेत. घाबरणार नाहीत!

किशोरी पेडणेकरांनी दिले वेगळे वळण… म्हणतात, यशवंत जाधव हे भीमपुत्र आहेत. घाबरणार नाहीत!

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर खात्याने धाडी टाकल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याला वेगळा रंग दिला आहे. यशवंत जाधव हे भीमपुत्र आहेत. ते संविधान मानणारे आहेत, असल्या धाडींना ते घाबरणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी सकाळी जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर खात्याने धाडी घातल्या. त्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली. त्यावर बोलताना महापौर पेडणेकर म्हणाल्या की, आयटी फॉर्म भरताना काही त्रुटी राहिली असेल तर ते त्याची माहिती देतील. त्याचा एवढा कशाला बाऊ करायला हवा? धाड पडली, धाड पडली असा ओरडा कशाला केला जात आहे?

पेडणेकर म्हणाल्या की, अशा धाडी अनेकवेळा पडल्या आहेत. अनेकांवर अशा धाडी पडल्या आहेत. आयटी फॉर्ममध्ये काही कमतरता असेल ती तपासण्यासाठी ते अधिकारी आले असतील.

हे ही वाचा:

श्रीलंकेच्या भारतीय राजदूतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट

अमेरिका आपले सैन्य युक्रेनमध्ये पाठवणार नाही!

आयपीएल २०२२चा रणसंग्राम मुंबई, पुण्यात; या तारखेपासून सुरू होणार सामने

शिवसेनेची आंदोलनाला टांग

 

पेडणेकर यांनी सांगितले की, आम्ही कशालाही घाबरणार नाही. जिथे भाजपाची सत्ता नाही तिथेच अशा कारवाया होत आहेत. या धाडींमुळे यांना आसुरी आनंद होत आहे. पण लोक हे सगळे पाहात आहेत.

किरीट सोमय्या यांनी महापौर पेडणेकर यांच्यावर आरोप केला होता. त्यांच्या आठ गाळ्यांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. त्यावर पेडणेकर म्हणतात की, किरीट भावा, मला माझे आठ गाळे कुठे आहेत ते परत आणून दे. हा मुंबई आणि महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या सगळ्या परिस्थितीत शिवसैनिकांनी चुकीचे वागू नये म्हणून त्यांना सावरण्यासाठी मी इथे आली असल्याचेही पेडणेकर म्हणाल्या.

Exit mobile version