कदाचित माझे शब्द मोदीजींना आवडले नसावेत!

लोकसभेचे तिकीट कापल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांची प्रतिक्रिया

कदाचित माझे शब्द मोदीजींना आवडले नसावेत!

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत.भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा देखील या यादीत समावेश आहे.यावेळी प्रज्ञा ठाकूर यांच्या जागी आलोक शर्मा यांना संधी देण्यात आली आहे.

आज तकच्या बातमीनुसार, लोकसभा निवडणुकीचे तिकीट रद्द झाल्याचे प्रज्ञा ठाकूर यांना विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या की, माझ्या तोंडून निघालेले शब्द कदाचित पंतप्रधान मोदीजींना आवडले नसावेत. त्या पुढे म्हणाल्या की, कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही हा संघटनेचा निर्णय आहे.त्यामुळे तिकीट का कापले, कशामुळे कापले याचा अजिबात विचार करू नये.मी यापूर्वी तिकीटाची मागणी केली नव्हती आणि पुढेही करणार नाही, असे प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या.

हे ही वाचा:

बहुमतानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ

पश्चिम बंगालमध्ये १६ लाख बनावट मतदार

पदाधिकाऱ्यांना आघाडीच्या बैठकांना जाण्यास आंबेडकरांकडून मनाई; राऊतांकडून सावरासावर

भोजपुरी गायक पवन सिंग यांची निवडणुकीतून माघार!

दरम्यान, भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.यामध्ये ३४ विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत.प्रज्ञा ठाकूर यांचे तिकीट रद्द झाल्याची अटकळ आधीच होती.प्रज्ञा ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानांमुळे पक्ष नेतृत्व नाराज असल्याचे मानले जात होते.अशा परिस्थितीत त्यांच्या तिकिटावर कात्री लागण्याची सर्वाधिक शक्यता होती.

अनेकदा वादग्रस्त विधाने करून टीकेच्या भोवऱ्यात सापडलेल्या प्रज्ञा ठाकूर यांनी असे विधान केले होते की, ज्यावर पंतप्रधान मोदींनी टीका केली होती आणि मी त्यांना कधीही माफ करू शकणार नाही,असे म्हटले होते. प्रज्ञा ठाकूर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला खरा देशभक्त असल्याचे म्हणाल्या होत्या.प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली अन म्हणाले की, प्रज्ञा ठाकूर यांनी जरी माफी मागितली असली तरी त्यांना कधीही माफ करू शकणार नाही.

Exit mobile version