मायावती म्हणतात, राहुल गांधी यांनी आधी स्वतःच्या पक्षात डोकावून पाहावे!

मायावती म्हणतात, राहुल गांधी यांनी आधी स्वतःच्या पक्षात डोकावून पाहावे!

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर मायावती म्हणतात की, बसपवर भाष्य करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वत:च्या पक्षात डोकावून पाहावे, राहुल गांधींपूर्वी त्यांच्या वडिलांनीही बहुजन समाज पक्ष आणि कांशीराम यांची बदनामी करण्याचे सीआयए एजंटला सांगितले होते, आता मुलगाही तेच करतोय, असा घणाघात मायावतींनी राहुल गांधींवर केला आहे.

राहुल गांधींनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसशी युती करण्यासाठी मायावतींशी काँग्रेसने संपर्क साधला होता. तसेच मायावतींना काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाची ऑफर देखील दिली होती. मायावती ईडी-सीबीआयला घाबरतात आणि त्या आता निवडणूक लढवत नाहीत, असे राहुल म्हणाले होते. या राहुल गांधींच्या वक्त्यव्यावरून मायावतींनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

राहुल यांच्या या वक्तव्यानंतर मायावतींनी रविवारी, १० एप्रिलला लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. मायावती म्हणाल्या की, ” काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच घृणास्पद डावपेच अवलंबत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीही या वर्तनाच्या विरोधात आवाज उठवला होता. काँग्रेसने इतर पक्षांची चिंता करण्यापेक्षा स्वतःची चिंता करावी. राहुल गांधींची अवस्था एका उदास मांजरासारखी आहे, ज्याला आपले स्वतःचे घरदेखील व्यवस्थित ठेवता येत नाही. स्वतःच्या पक्षात गांधींनी डोकावून बघावे, ” अशी सडकून टीका मायावतींनी गांधींवर केली आहे.

हे ही वाचा:

पोलिसांना चुकविण्यासाठी गो तस्करांनी गाईंनाच गाडीतून फेकले

‘श्रीरामांच्या आचार-विचारांचा जीवनात सर्वांनी अंगीकार करायला हवा’

पृथ्वीराजच्या रूपात कोल्हापूरला मिळाली २१ वर्षांनी महाराष्ट्र केसरीची गदा

पंढरपूरमध्ये पांडुरंगाने आशीर्वाद दिला, कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई देईल

मायावती पुढे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाच्या वतीने मला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवण्याच्या संदर्भात मी उत्तर न दिल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. राहुल गांधी बसपा आणि पक्षप्रमुखांबद्दल जी टिप्पणी करत आहेत त्यातून दलित आणि बसपा पक्षप्रमुखांबद्दलची त्यांची जातीय अवहेलना दिसून येते.

Exit mobile version