उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएवर ‘माया’

उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएवर ‘माया’

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रालोओच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना सर्वच पक्षांकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या बळावर रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून आल्या. आता होऊ घातलेल्या उप-राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही काहीसा हाच कल दिसून येत आहे. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी रालोओचे उमेदवार पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मायावती यांनी ट्विट करून याची औपचारिक घोषणा केली आहे. बसपने व्यापक जनहित आणि आपली चळवळ लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे मायावती यांनी म्हटलं आहे. मायावतींच्या या घोषणेनंतर विरोधकांच्या गटात खळबळ माजली आहे.

बसपा सुप्रीमो मायावती यांनी ट्विट केले की, देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्ता आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत न झाल्याने अखेर त्यासाठी निवडणूक घेण्यात आली हे सर्वश्रुत आहे. आता ६ ऑगस्टला होत असलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतह तिच परिस्थिती आहे. त्यामुळे व्यापक जनहित आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपली चळवळ लक्षात घेऊन जगदीप धनखड यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून त्याची औपचारिक घोषणाही मी आज करत असल्याचे मायावतींनी म्हटलं आहे.

विरोधकांचा मार्गारेट अल्वांना पाठिंबा

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी ६ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे.भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. विरोधी पक्षांनी मार्गारेट अल्वा यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे. मार्गारेट अल्वा याही गव्हर्नर राहिल्या आहेत.

Exit mobile version