मायावतींचा संसदभवन उद्घाटनाला पाठिंबा; विरोधकांना सुनावले

बहुजन समाज पक्षाने म्हटले की, देशहिताच्या निर्णयात पक्ष न पाहता आम्ही पाठिंबा देतो

मायावतींचा संसदभवन उद्घाटनाला पाठिंबा; विरोधकांना सुनावले

आणखी तीन दिवसांनी संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याविरोधात अनेक पक्ष उभे राहिले आहेत, पण काही पक्षांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे किंवा या कार्यक्रमाला पाठिंबाही दर्शविला आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दर्शविला आहे.

मायावती यांनी ट्विट करून आपल्या पाठिंब्याची माहिती दिली आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे विरोधकांना धक्का बसला आहे. मायावती यांनी तीन ट्विट करून आपल्या पाठिंब्याबद्दल सांगितले आहे त्यांनी म्हटले आहे की, केंद्रात काँग्रेसचे सरकार होते किंवा भाजपाचे बहुजन समाज पक्षाने नेहमीच राजकारणाच्या पलिकडे जाऊन विचार केला आहे, पावले उचलली आहेत. त्यानुसार २८ मे रोजी संसदेच्या या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाकडेही आम्ही त्याचपद्धतीने पाहतो. आम्ही या उद्घाटन कार्यक्रमाचे स्वागत करतो.

मायावती म्हणाल्या की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन का नाही, असे म्हणत विरोधकांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. पण तो अनुचित वाटतो. सरकारने हे संसद भवन उभारले आहे त्यामुळे त्यांना या वास्तूच्या उद्घाटनाचा अधिकार आहे. या सगळ्या कार्यक्रमाचा संबंध आदिवासी महिलेच्या सन्मानाशी जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच असेल तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात उमेदवार उभे करताना त्यांच्या आदिवासी असण्याचा मुद्दा विचारात घ्यायला हवा होता.

हे ही वाचा:

राज्याच्या बारावीच्या निकालात कोकण सरस, मुंबईने गाठला तळ, मुलींनी मारली बाजी

दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन व्हेंटिलेटरवर

संसदभवन उद्घाटनावर बहिष्कार हे विरोधकांच्या वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक

मुंबई-पुणे मार्गांवरील बेशिस्त वाहनचालक सुतासारखे सरळ होतायत! कारवाईचा बडगा

मायावती यांनी आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशाला समर्पित करण्यात येणाऱ्या संसदभवनाच्या उद्घाटन सोहळ्याचे मला निमंत्रण आले आहे. त्याबद्दल मी आभारी आहे आणि माझ्या या कार्यक्रमाला शुभेच्छा आहेत. पण काही ठरलेल्या कार्यक्रमांमुळे मी त्या समारंभात सहभागी होऊ शकणार नाही. एकूण १९ पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी अशा पक्षांचा समावेश आहे.

Exit mobile version