मायावती काँग्रेस, सपावर भडकल्या; मुस्लीम मतदारांना खुश करण्याचे लाचार प्रयत्न

संसदेत राष्ट्रीय आणि सार्वजनिक हिताचे मुद्दे उपस्थित न केल्याबद्दल मायावती यांनी विरोधकांना सुनावले

मायावती काँग्रेस, सपावर भडकल्या; मुस्लीम मतदारांना खुश करण्याचे लाचार प्रयत्न

BSP Supreemo Mayawati addressing press conference at her official residence in Lucknow on Saturday. Express Photo by Vishal Srivastav. 24.03.2018.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांकडून सातत्याने गदारोळ सुरू असल्यामुळे संसदेचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागत आहे. यामुळे संसदेचे कामकाज नीट चालत नसून बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) नेत्या आणि यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

मायावती यांनी संसदेत गदारोळ घालणाऱ्या विरोधकांना कोंडीत पकडले आहे. देशाचे आणि जनहिताचे मुद्दे न मांडल्याबद्दल टीका केली आहे. मायावती म्हणाल्या की, “संसदेत विरोधक राष्ट्रीय आणि सार्वजनिक हिताचे मुद्दे उपस्थित करत नाहीत. उलट त्यांच्या राजकीय हितासाठी, विशेषतः सपा आणि काँग्रेस पक्ष संभलमधील हिंसाचाराच्या निमित्ताने मुस्लीम मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते इतर मुद्द्यांवरून त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना इतर काहीही देणं-घेणं नाही. संभलमधील लोकांना आपापसात भांडायला लावले जात आहे त्यामुळे मुस्लीम समाजानेही सतर्क राहावे,” असा इशारा मायावती यांनी दिला आहे.

मायावती म्हणाल्या की, त्याहूनही दुःखद गोष्ट म्हणजे दलित वर्गातील खासदार, ज्यांनी त्यांना संसदेपर्यंत पोहोचवण्यात मदत केली, तेही आपापल्या पक्षांच्या बॉसला खूश करण्यासाठी दलित अत्याचाराच्या मुद्द्यांवर मौन बाळगून आहेत. यापूर्वी बसपा अध्यक्षा मायावती यांनी केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांना संसदेचे चालू अधिवेशन व्यापक राष्ट्रहितासाठी सुरळीत चालावे, यासाठी आवाहन केले होते.

हे ही वाचा:

नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विरोधी आमदारांचा शपथ घेण्यास नकार

“विजयी मतांमध्ये एकही मुस्लीम मत नाही; मी हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारासंघाचा आमदार”

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कळसाला मिळणार सुवर्ण झळाळी!

सीरियामध्ये गृहयुद्ध भडकलं; भारतीयांना प्रवास टाळण्याचा भारत सरकारचा सल्ला

मायावती यांनी शनिवारी येथे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाध्यक्षांसह पक्षाच्या इतर सर्व जबाबदार लोकांच्या बैठकीला संबोधित करताना, दलित आणि आंबेडकरी समुदायांनी राजकीय सशक्तीकरणाच्या संघर्षात एकत्र येण्याची गरज आहे, असे सांगितले. भूतकाळातील काँग्रेस सरकारप्रमाणेच सध्या भाजपच्या गरीब विरोधी आणि भांडवलशाही समर्थक धोरणांविरोधात जनतेमध्ये रोष आहे. त्यामुळेच जनतेचे मन वळविण्यासाठी पक्ष जातीवादी, जातीयवादी आणि संकुचित वृत्तीचा अवलंब करत आहे. राज्याचे योगी सरकार घटनात्मक जबाबदाऱ्यांपेक्षा धार्मिक कार्यक्रमाला प्राधान्य देत असल्याचा आरोप मायावतींनी केला.

Exit mobile version