निवडणूक रणनितीकार मानले जाणारे प्रशांत किशोर यांच्या मते भाजप सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत कमाल कामगिरी करू शकतो. या दरम्यान बंगाल आणि तेलंगणाबाबतही त्यांनी काही आश्चर्यजनक दावे केले.
प्रशांत किशोर यांच्या मते, तमिळनाडूमध्ये भाजप पहिल्यांदाच दोन अंकी मजल गाठू शकतो. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काही भाकिते वर्तवली. ‘भाजप तेलंगणातही चांगली कामगिरी करू शकतो. तर, संदेशखालीसारख्या मुद्द्यांमुळे सत्ताधारी पक्षाला नुकसान होऊ शकते. संदेशखाली घटना झाली नसती तरीही भाजप बंगालमध्ये चांगली कामगिरी करतच होता,’ असेही त्यांनी नमूद केले. ज्यांना दिल्लीत बसून वाटतेय की बंगालमध्ये भाजप संपला, त्यांच्यासाठी २०२४चे निकाल आश्चर्यजनक असतील, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
पाच वर्षांच्या मुलाची उच्च न्यायालयात जनहित याचिका!
‘मोदीजींनी घरात भांडण लावून दिले, असे तर होणार नाही ना?’
‘आज कोणीही मनमानीपणे आपल्या इच्छेविरोधात व्हिटो करू शकत नाही’!
वडेट्टीवारांनी केले जरांगेंच्या भाजपा प्रवेशाचे सुतोवाच…
भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत ३७० किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र प्रशांत किशोर यांना हे शक्य वाटत नाही. तर, इंडिया गटाबाबतही त्यांनी भाष्य केले. ही आघाडी जे काही आता करतेय, ते त्यांनी वर्षभरापूर्वीच करणे अपेक्षित होते. गेल्या वर्षी इंडिया गटाने सात ते १० दिवसांपेक्षा जास्त काम केले नाही. जर राहुल गांधी सात दिवसांसाठी युरोप जाऊ शकतात, तर इंडिया गट इतकं काम इथे का नाही करू शकत?, असा प्रश्न विचारून इंडिया गटाला आता २०२४च्या पुढील निवडणुकीचा विचार केला पाहिजे, असा सल्लाही प्रशांत किशोर यांनी दिला.