“मुंबईकरांसाठी महत्वाच्या असणा-या कोस्टल रोडच्या कामात १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग आताचा दिसू लागाला आहे. या प्रकरणी तातडीने कंन्टल्टनला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि या अपहाराची व लुटमारीची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी!” अशी मागणी करत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारच्या हल्लाबोल केला आहे.
याचबरोबर केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहून पर्यावरणाबाबत निकषांचे पालन न केल्या प्रकरणी महापालिकेकडून खुलासा मागावा अशी विनंतही शेलार यांनी केली आहे.
मुंबईकरांसाठी महत्वाच्या असणा-या कोष्टल रोडच्या कामात १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग आताचा दिसू लागाला आहे. या प्रकरणी तातडीने कंन्टल्टनला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि या अपहाराची व लुटमारीची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/atcKqIMgOv
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 2, 2021
आशिष शेलार यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन कोस्टलरोड मधील भ्रष्टाचार उघड केला आहे. यापुर्वी त्यांनी ६ सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन कोस्टल रोडच्या कामात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अरोप केला होता. आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आशिष शेलार यांनी पुराव्यासहित या कामात कसा भ्रष्टाचार होतोय हे उघड केले.
हे ही वाचा:
चीनची तैवानवर हवाई हल्ल्याची तयारी
इराण-अझरबैजान युद्धाची ठिणगी पडली?
अंधेरीत भाजयुमो कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला
एलएसीचं रक्षण करायला ‘वज्र’ तैनात
“कोस्टल रोड हा भाजपाचा ड्रिम प्रोजेक्ट असून मुंबईला त्याची गरज आहे. म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या परवानग्या तातडीने मिळवून दिल्या. त्यानंतर मात्र ज्या पध्दतीने काम सुरू आहे ते निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. या प्रकल्पाला भाजपाचा विरोध नसून यातील भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे.” असं आशिष शेलार यांनी यावेळी स्पष्ट केलं.