महाराष्ट्रात आता मास्क ऐच्छिक!

महाराष्ट्रात आता मास्क ऐच्छिक!

येत्या गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील कोरोनाचे निर्बंध उठवण्यात आले आहेत. कोरोनातील महत्वाचा नियम म्हणजे मास्क घालणे. याच मास्कबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र आता निर्बंध मुक्त झाला आहे, मात्र मास्क घालणे हे ऐच्छिक असणार आहे.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्बंध मुक्तीचा एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, गुढीपाडव्यापासून कोरोनाचे निर्बंध हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता राज्यात गुढीपाडव्यापासून येणारे सर्व सण साजरे करता येणार आहेत. मात्र लोकांच्या काळजीसाठी मास्क ऐच्छिक ठेवले आहेत. त्यामुळे लोकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या काळजीच्या दृष्टीने मास्कचा वापर करावा, असा सल्ला टोपेंनी दिला आहे.

तसेच त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची देखील माहिती दिली आहे. ते म्हणाले, वयवर्षे ४० ते ५० या वयोगटातील शासकीय कर्मच्याऱ्यांना पाच हजारापर्यंत मोफत आरोग्याच्या आवश्यक चाचण्या करता येणार आहेत. या कर्मचाऱ्यांची संख्या २२ लाख पर्यंत आहे. तर वयवर्षे ५० ते ६० या वयोगटातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी या चाचण्या बंधनकारक असणार आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी १०५ कोटी खर्च करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

‘गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान का पता ना चले’…कव्वाली गायक नवाज शरीफची मुक्ताफळे! गुन्हा दाखल

‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’

महाराष्ट्र राज्य कोरोना निर्बंध मुक्त! सगळे उत्सव उत्साहात साजरे करा!!

भाजपाच्या मिशन २०२४ ची जय्यत तयारी सुरु!

आतापर्यंत ५० टक्के लोक बस ट्रेनमध्ये क्षमता होती, आता १०० टक्के लोक प्रवास करू शकतात. तर आता मॉल्स, चित्रपटगृहात, विना लस प्रमाणपत्राशिवाय प्रवेश मिळणार, मास्क बंधनकारक नसणार आहे. कोरोना महामारीत जे दोन कायदे लागू केले होते ते मागे घेण्यात आले आहेत. दुकाने, उपाहारगृह ५० टक्क्यांनी सुरु होते ते आता पूर्ण क्षमतेने सुरु असणार आहेत. हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट यांच्यावरही वेळेचे निर्बंध होते तेही आता हटवण्यात आले आहे. लोकल प्रवासातही लसीचे दोन्ही डोस बंधनकारक होते, त्यातही आता सूट देण्यात आली आहे.

Exit mobile version